IPL 2019 : Focus on your strengths - Sachin Tendulkar advice to Rahul Chahar | IPL 2019 : सचिन तेंडुलकरचा सल्ला कामी आला, राहुल चहरच्या यशामागचं गुपित
IPL 2019 : सचिन तेंडुलकरचा सल्ला कामी आला, राहुल चहरच्या यशामागचं गुपित

जयपूर, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरने शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. त्याने राजस्थानच्या अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स या प्रमुख खेळाडूंना बाद करून मुंबई इंडियन्सला मोठे यश मिळवून दिले. राहुल चहरच्या या यशामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा हात आहे. तेंडुलकरने दिलेल्या सल्ल्यामुळे चहरला हे यश मिळाले आहे. मुंबई इंडियन्सने 2018च्या आयपीएल लिलावात चहरला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पण, त्याला 2019 मध्ये मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. या एका वर्षाच्या काळात चहरने स्थानिक क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले. 19 वर्षीय चहरने यंदाच्या आयपीएलमध्ये शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि कॉलीन मुन्रो या महत्त्वाच्या खेळाडूंना बाद करण्याची किमया केली आहे.


तेंडुलकरने त्याला सल्ला दिला होता. त्याने सांगितले होते की,''तेंडुलकरने मला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. मी जलद आणि फ्लॅट चेंडू टाकत होतो आणि त्यामुळे मला चेंडू वळवण्यात मदत मिळत नव्हती. तेंडुलकर सरांनी मला गोलंदाजीत सुधारणा करण्यासाठी मदत केली. अधिक स्पिन करू नकोस, असा सल्ला त्यांनी मला दिला. मला नेट्समध्ये गोलंदाजी करताना त्यांनी पाहिले होते आणि त्यांना माझ्यात काहीतरी वेगळेपण जाणवले.'' 

पाहा व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/174652
https://www.iplt20.com/video/174633   


Web Title: IPL 2019 : Focus on your strengths - Sachin Tendulkar advice to Rahul Chahar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.