Ipl 2019- csk vs dc live update : चेन्नईची दिल्लीवर सहा विकेट्स राखून मात | Ipl 2019- csk vs dc live update : चेन्नईची दिल्लीवर सहा विकेट्स राखून मात
Ipl 2019- csk vs dc live update : चेन्नईची दिल्लीवर सहा विकेट्स राखून मात

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात विजय मिळवत धडाक्यात सुरूवात केली. चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा, तर दिल्लीनं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण, चेन्नईला विजयासाठी 71 धावाच करायच्या होत्या, तर दिल्लीनं 213 धावा चोपल्या. त्यामुळे आज फिरोज शाह कोटलावर होणाऱ्या सामन्यात चेन्नईचे गोलंदाज विरुद्ध दिल्लीचे फलंदाज असे युद्ध पाहायला मिळेल. दिल्लीच्या रिषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 27 चेंडूंत 78 धावा चोपल्या होत्या. पंतचे हे वादळ रोखण्यासाठी चेन्नईचे अकरा शिलेदार सज्ज आहेत.

11:36 PM

चेन्नईचा अखेरच्या षटकात दिल्लीवर विजय

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने अखेर दिल्लीवर मात केली. हा सामना चेन्नईने सहा विकेट्स राखून जिंकला. यंदाचा हंगामातील दोन्ही सामने चेन्नईने जिंकले आहेत.

11:33 PM

केदार जाधव आऊट

केदार जाधवच्या रुपात चेन्नईला चौथा धक्का बसला. केदारने २७ धावांची खेळी साकारली.

11:07 PM

केदार जाधवला जीवदान

केदारला १८ धावांवर असताना शिखर धवनने जीवदान दिले.

10:54 PM

रैना आऊट 

10:33 PM

वॉटसन आऊट, चेन्नईला दुसरा धक्का

शेन वॉटसनच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. वॉटसनने 26 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या.

10:22 PM

चेन्नईच्या पाच षटकांमध्ये ५१ धावा

चेन्नईने पहिल्या पाच षटकांमध्ये ५१ धावा पूर्ण केल्या. पाचव्या षटकाच्या अखेरच्या तिन्ही चेंडूवर सुरेश रैनाने चौकार ठोकले.

10:08 PM

चेन्नईला पहिला धक्का, अंबाती रायुडू बाद

अंबाती रायुडूच्या रुपात चेन्नईला पहिला फटका बसला. इशांत शर्माला मोठा फटका मारण्याच्या नादात रायुडूने आपली विकेट गमावली. रायुडूला यावेळी पाच धावाच करता आल्या.

10:04 PM

चेन्नईची दमदार सुरुवात

दिल्लीच्या १४८ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने चांगली सुरुवात केली. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी फटकेबाजी करत दोन षटकांत १६ धावा फटकावल्या.

08:23 PM

दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ आऊट

दीपक चहारने पृथ्वी शॉ याला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने यावेळी 16 चेंडूंत २५ धावा केल्या.

08:16 PM

दिल्लीचा चौकारांचा 'चौकार'

दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात चौकारांचा चौकार ठोकला. पृथ्वी शॉ याने शार्दुल ठाकूरच्या दुसऱ्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर चौकार लगावले. त्यानंतर दीपक चहारच्या पहिल्याच चेंडूवर शिखर धवनने चौकार मारला.

08:01 PM

IPL 2019 : माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येतोय रिषभ पंत...

http://www.lokmat.com/cricket/ipl-2019-ms-dhoni-be-ready-because-rishabh-pant-good-form/

07:38 PM

दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली. त्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


Web Title: Ipl 2019- csk vs dc live update : चेन्नईची दिल्लीवर सहा विकेट्स राखून मात
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.