IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनावर रसेलनं पाणी फिरवलं, कोलकाताचा थरारक विजय

IPL 2019: सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 07:54 PM2019-03-24T19:54:51+5:302019-03-24T20:02:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Andre Russell done for KKR, Kolkata knight riders thrilling victory over SRH | IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनावर रसेलनं पाणी फिरवलं, कोलकाताचा थरारक विजय

IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनावर रसेलनं पाणी फिरवलं, कोलकाताचा थरारक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीनं कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले. एका वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरच्या ( 85) फटकेबाजीनं हा सामना गाजवला, परंतु आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात विजय खेचून आणला आणि वॉर्नरच्या खेळीवर पाणी फिरवलं. 



 

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 3 बाद 181 धावा चोपल्या. वॉर्नर व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना कोलाकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना हतबल केले. वॉर्नरला पाचव्या षटकात दिलेले जीवदान कोलकाताला महागात पडले. 13व्या षटकात अखेर कोलकाताला पहिले यश मिळाले, पियुष चावलाने हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला त्रिफळाचीत केले आणि डेव्हिड वॉर्नरसोबतची 118 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, वॉर्नर थांबला नाही आणि त्याने 85 धावा कुटल्या. शंकरने 24 चेंडूंत नाबाद 40 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. बेअरस्टो 39 धावांवर माघारी परतला.



लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा ख्रिस लीन दुसऱ्याच षटकात माघारी फिरला. शकिब अल हसनने त्याला बाद केले. त्यानंतर युसूफ पठाणने रॉबीन उथप्पाचा सोपा झेल सोडला. त्यानंतर उथप्पा आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, सिद्धार्थ कौलने त्यांची 80 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. 27 चेंडूंत 35 धावा करणाऱ्या उथप्पाला त्यानं त्रिफळाचीत केले. 


पण, राणाने एका बाजूने फटकेबाजी करताना कोलकाताच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या होत्या. पण, 16व्या षटकांत राणा बाद झाला. त्याने 47 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 68 धावा केल्या. रशीद खानने त्याला पायचीत केले. राणा बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलने कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलनं 19 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 49 धावा केल्या.

Web Title: IPL 2019: Andre Russell done for KKR, Kolkata knight riders thrilling victory over SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.