IPL 2018: Virat Kohli's acting video became viral | IPL 2018 : अनुष्कापेक्षा भारी अभिनय करतो विराट कोहली, व्हिडीओ झाला वायरल
IPL 2018 : अनुष्कापेक्षा भारी अभिनय करतो विराट कोहली, व्हिडीओ झाला वायरल

बंगळुरू, आयपीएल 2019 : विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमध्ये अभिनेत्री आहे. पण नुकताच एक व्हिडीओ वायरल झाला असून त्यामध्ये विराट हा भन्नाट अॅक्टींग करताना दिसत आहे.

विराट आणि अनुष्का हे एक वर्चुअल रिएलिटी शूटिंग गेम खेळत होते. यामध्ये अनुष्का विराटला गोळ्या मारताना दिसते. त्यानंतर विराट हा गोळ्या लागल्यावर मरणाची अॅक्टींग करताना दिसतो. यावेळी कोहलीने केलेली अॅक्टींग चाहत्यांना चांगलीच आवडलेली दिसत आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांना निराश केले आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे.

कोहली हा चांगला फलंदाज आहेच, पण त्याचबरोबर चपळ क्षेत्ररक्षकही आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र कोहलीकडून सातत्यपूर्ण फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेले नाही. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये कोहलीला सहा वेळा झेल पकडण्याची संधी मिळाली होती. पण सहा पैकी फक्त दोन झेल कोहलीला पकडता आले. कोहलीकडून सहा पकी चार झेल सुटल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याबरोबर सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहलीने पहिले स्थान पटकावले आहे.

कोहलीच्या पावलावर त्यांच्या संघानेही पाऊल ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आतापर्यंत बंगळुरुच्या संघापुढे 50 वेळा झेल पकडण्याच्या संधी आल्या. या 50पैकी 20 झेल बंगळुरुच्या संघाने सोडले आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल राजस्थान रॉयल्सच्या जेफ्रो आर्चरने सोडले आहेत. आर्चरला सहापैकी एकही झेल पकडता आलेला नाही.


Web Title: IPL 2018: Virat Kohli's acting video became viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.