टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती मुंबईत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:02 AM2019-08-16T03:02:22+5:302019-08-16T03:02:49+5:30

whatsapp join usJoin us
Interview for Team India's coach today! Attention to the Advisory Committee | टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती मुंबईत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेईल. यामध्ये विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद कायम राहण्याबाबत दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी शास्त्री यांनाच प्रबळ दावेदार मानले जात आहे.

असे असले तरी, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्याकडून शास्त्री यांना कडवी लढत मिळू शकते. २००७ सालच्या टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत यांच्या अर्जावरही गांभीर्याने विचार होऊ शकतो. तसेच, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले आहेत.

२०१७ सालानंतर पुन्हा एकदा टीम इंडियासह जुळल्यानंतर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी चांगलीच उंचावली. यादरम्यान भारताने गेल्या वर्षी पहिल्यांदाच आॅस्टेÑलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. जुलै २०१७ पासून भारतीय संघाने २१ कसोटी सामन्यांपैकी १३ सामने जिंकले असून टी२० सामन्यांत ३६ पैकी २५ लढती जिंकल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्येही भारताने ६० पैकी ४३ सामने जिंकले. त्यामुळेच कर्णधार कोहलीच्या पाठिंब्यानंतर २०२१ सालच्या विश्वचषकापर्यंत शास्त्री यांना भारताच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाली, तरी आश्चर्य वाटणार नाही.

मूडी यांच्याकडून मोठी स्पर्धा
शास्त्री यांना टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आॅस्टेÑलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांच्याकडून सर्वांत मोठी स्पर्धा मिळू शकते. याआधीही मूडी यांची भारताच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखत झालेली आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून मूडी यांनी मोठे यश मिळविले आहे. भारताचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांच्या अर्जावर जरी विचार झाला तरी, शास्त्री यांना डावलण्याचा निर्णय घेणे कठीण होऊ शकते.

रवी शास्त्री यांच्याकडे ८० कसोटी आणि १५० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. शास्त्री यांचा सध्याचा कार्यकाळ ब्रिटनमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेपर्यंतच मर्यादित होता, मात्र यानंतर त्यांचा कार्यकाळ ४५ दिवसांपर्यंत विंडीज दौऱ्यापर्यंत वाढविण्यात आला.

एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वातील निवड समितीद्वारे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या मुलाखती घेतल्या जातील. गोलंदाजी प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा भारत अरुण यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांच्याबाबतीत ठामपणे काहीही सांगता येणार नाही. तसेच, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांची पुन्हा एकदा निवड होऊ शकते; मात्र यासाठी त्यांना दिग्गज जॉन्टी ºहोड्स यांच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

Web Title: Interview for Team India's coach today! Attention to the Advisory Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.