India's young players search campaign in the right direction | भारताची युवा खेळाडू शोधमोहिम योग्य दिशेने

भारताची युवा खेळाडू शोधमोहिम योग्य दिशेने

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
भारताने बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करीत मालिका जिंकली. लढवय्या बांगलादेशविरुद्ध प्रतिष्ठा राखणाऱ्या मालिका विजयाची नोंद करताना पुढील वर्षी आॅस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली आयोजित टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची युवा खेळाडूंची शोधमोहिम योग्य मार्गावर असल्याचे सिद्ध झाले.
नवी दिल्लीतील पराभवानंतर अनुभवी यजुवेंद्र चहल व कर्णधार रोहित शर्मा यांनी राजकोटमध्ये संघाला विजय मिळवून दिला. निर्णायक लढतीत दडपणाखाली युवा खेळाडूंनी छाप सोडत संघाला विजय साकारुन दिला. नागपूरच्या खडतर खेळपट्टीवर लोकेश राहुलने शानदार खेळी करीत त्याला प्रतिभावान का समजण्यात येते, याचे उत्तर दिले. त्याने बेसिक्सवर कायम राहताना परंपरागत फटके खेळत धावा वसूल केल्या. त्याने या खेळीत ताकदीपेक्षा टायमिंगवर अधिक भर दिला. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यरनेही आपली चौथ्या क्रमांकावरील उपयुक्तता सिद्ध केली. राहुल भरात असताना श्रेयसने सहायकाची भूमिका स्वीकारली, तर त्यानंतर संघर्ष करणाºया रिषभ पंतसोबत खेळताना त्याने धावगती वाढविण्यावर भर दिला. त्याने सहाव्या गोलंदाजाला लक्ष्य करताना आपल्या बुद्धिमत्तेचीही चुणूक दाखविली. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाला परिस्थिती ओळखून भूमिका बजवावी लागते आणि त्यात श्रेयस यशस्वी ठरला.
कृणाल पांड्याला वगळण्यात आल्यानंतर भारताची गोलंदाजीची बाजू थोडी कमकुवत झाली होती. दवाचा प्रभाव बघता १७४ धावांचे लक्ष्य आव्हानात्मक नव्हते आणि बांगलादेशच्या दृष्टीने सर्वकाही नियंत्रणात होते. त्यानंतर रोहितने आपले नेतृत्वगुण दाखविले. त्याने आपल्या उपलब्ध पर्यायांचा योग्य वापर केला. मिथुन माघारी परतल्यानंतर भारताला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली. केवळ तिसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा अष्टपैलू शिवम दुबे गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत अधिक बळकट आहे. त्याने गोलंदाजीत विविधता दाखविली आणि त्याचे त्याला तीन बळींच्या रुपाने बक्षीसही मिळाले, पण दीपक चाहर खरा ‘हीरो’ ठरला. त्याने टी२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी कामगिरी करताना हॅट््ट्रिकही घेतली.
चाहरची गोलंदाजी येथील खेळपट्टीला अनुकूल होती. एकेकाळी केवळ आऊट स्विंग गोलंदाज असलेल्या दीपकने आपल्या भात्यात आणखी काही अस्त्रांची भर घातली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India's young players search campaign in the right direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.