शोएबनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर होणार भारताचा जावई

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएब मलिकशी लग्न केले होते. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात भारतीयांनी टीकेची झोड उठवली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:59 AM2019-07-30T11:59:40+5:302019-07-30T12:32:45+5:30

whatsapp join usJoin us
India's son-in-law will be another Pakistani cricketer after Shoaib | शोएबनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर होणार भारताचा जावई

शोएबनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर होणार भारताचा जावई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली:  पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनंतर लवकरच अजून एक पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे. भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झानेशोएब मलिकशी लग्न केले होते. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात भारतीयांनी टीकेची झोड उठवली होती. त्यातच आता हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरजू पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. शामिया एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे.  

शामिया पुढच्या महिन्यांत लग्नबंधनात अडकणार हा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडणार आहे. शामियाचे वडील लियाकत अलीने सांगितले की, "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले होते व त्यांच्याशी आमचा आजही संपर्क आहे.'' 

वाघा बॉर्डरवर केली होती 'कार्टून'गिरी

इंग्लंड आणि आयर्लंड दौ-यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा ट्रेनिंग कॅम्प सुरू होता. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी संघाला वाघा बॉर्डरवर नेण्यात आलं होतं. वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानकडून परेड सुरू असतानाच अचानक हसन अलीनं विकेट घेण्याच्या अंदाजात भारतीय जवानांकडे पाहून हावभाव केले. बळी मिळवल्यानंतर जसा आनंद साजरा केला जातो, तसेच हावभाव तो भारतीय जवानांकडे पाहून करत होता. यानंतर  हसन अलीला भारतीयांनी असं संबोधलं होते.

हसन अलीनं 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही त्याला समावेश करण्यात आला होता. हसन अलीच्या नावावर 50 वन डे विकेट आहेत. हसन अलीनं शेवटचा सामना वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेळला होता.

Web Title: India's son-in-law will be another Pakistani cricketer after Shoaib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.