मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन; आयपीएलमध्ये आहेत 156 विकेट्स!

राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज चेतन सकारिया वडील कांजीभाई यांचं रविवारी कोरोनामुळे निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:07 PM2021-05-10T12:07:40+5:302021-05-10T12:08:11+5:30

whatsapp join usJoin us
Indian Spinner Piyush Chawla’s Father Pramod Kumar Chawla Passes Away Due To Covid-19 | मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन; आयपीएलमध्ये आहेत 156 विकेट्स!

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन; आयपीएलमध्ये आहेत 156 विकेट्स!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज चेतन सकारिया वडील कांजीभाई यांचं रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला आहे. कांजीभाई यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज पीयूष चावला ( Piyush Chawla has lost his father) याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे कोरोनामुळे निधन झाले. पीयूषनं इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून ही माहिती दिली. मुंबई इंडियन्सही त्यांना श्रद्धांजली वाहिली. ''त्यांच्याशिवाय आता आयुष्य वेगळं असेल, ते माझे पिलर होते,''असे पीयूषनं लिहिलं. 


2014 च्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा तो सदस्य होता. 2021च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सनं आपल्या ताफ्यात घेतले. पण, त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. 32 वर्षीय पीयूष हा 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही सदस्य होता. पण, 2012नंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.  आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 164  सामन्यांत 156 विकेट्स आहेत.
    

चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनानं निधन

राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला आहे. कांजीभाई यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये चेतन सकारिया यानं आपल्या चमकदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आली. स्पर्धा थांबल्यानंतर चेतन घरी परतण्याऐवजी थेट रुग्णालयात गेला होता. आयपीएलमधून कमावलेल्या पैशातून चेतन त्याच्या वडिलांवर उपचार करत होता.

भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर; कोरोनामुळे आईपाठोपाठ बहिणीचेही झाले निधन 

भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी तिच्या बहिण वत्सला हिचं निधन झालं होतं, दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच तिच्या आईचंही निधन झालं होतं. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु मागील आठवड्यात वेदाच्या आईचं आणि काही दिवसानंतर तिच्य़ा बहिणीचं निधन झालं.

 

Web Title: Indian Spinner Piyush Chawla’s Father Pramod Kumar Chawla Passes Away Due To Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.