India won the World Cup, but Vikrama has won the tournament | भारताचा विश्वचषक हुकला, पण विक्रमांनी गाजवली स्पर्धा
भारताचा विश्वचषक हुकला, पण विक्रमांनी गाजवली स्पर्धा

मुंबई/जळगाव : बुधवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला. स्पर्धेत सर्वात तगडा संघ म्हणून सहभागी झालेल्या टीम इंडियाकडे जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते आणि स्पर्धेत त्यांनी तशी दमदार वाटचालही केली होती.


केवळ यजमान इंग्लंडविरुद्धचा पराभव वगळता संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने विजयी कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दक्षिण आफ्रिकेला सलामीला सहज नमविल्यानंतर, पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियालाही सहजपणे धूळ चारत भारताने आपले नाणे खणखणीत वाजवले होते. मात्र पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली तरी २०१५ सालच्या विश्वचषकाची. त्यावेळीही भारताने गटसाखळीतील सर्व सामने जिंकले होते आणि धक्का बसला तो उपांत्य फेरीत. आताही तेच झाल्याने भारतीय पाठिराखे निराश झाले. मात्र भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडलीच, हे नाकारता येणार नाही. अनेक विक्रमांकाची माळ गुंफताना भारतीयांनी अभिमानास्पद कामगिरी केली. यात सर्वात अग्रेसर राहिला तो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा. काही विक्रमांवर टाकेलेली नजर...


रोहितचा तडाखा
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्व क्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहचला. सलग तीन सामन्यात शतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची नोंद झाली. त्याच्याआधी अशी कामगिरी १० फलंदाजांनी केली होती. तो मात्र केवळ दुसराच भारतीय फलंदाज ठरला. विराट कोहलीने २०१८ मध्ये वेस्ट इंडिज दौºयात अशी कामगिरी केली होती. शिवाय एकाच विश्वचषकात सर्वाधिक
५ शतके झळकावताना रोहितने श्रीलंकेच्या कुमार संगाकारच्या नावावरील
४ शतकांचा विश्वविक्रमही मोडीत काढला.

भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय
भारत वि. पाकिस्तान या ‘हायव्होल्टेज’ सामन्याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले होते. विश्वचषकात हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत ७ वेळा आमने- सामने आले आणि त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला. मात्र यंदा भारताने ८९ धावांनी मिळवलेला विजय स्पर्धेत पाकविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.
या आधीच्या
विजयातील अंतर
१९९२ - ४३ धावा
१९९६ - ३९ धावा
१९९९ - ४७ धावा
२००३ - ६ गडी
२०११ - २९ धावा
२०१५ - ७६ धावा

कोहलीची
‘विराट’ कामगिरी
पाकिस्तानविरुद्ध कोहलीने अर्धशतक झळकावत एकदिवसीय सामन्यात ११ हजार धावा पूर्ण करताना त्याने सचिन तेंडुलकरचा १७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला. विराटने २२२ डावांत ही कामगिरी केली. सचिनने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कानपूरमध्ये ही कामगिरी केली होती. यासाठी त्याला २७६ डाव खेळावे लागले होते. ११ हजार धावा करणारा विराट तिसरा भारतीय, तर क्रिकेटविश्वातील नाववा फलंदाज ठरला. सौरव गांगुलीनेही अशी कामगिरी केली आहे.

कोहलीच्या एक हजार धावा
विराट कोहलने साखळी फेरीतील श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकात एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा जगातील विसावा आणि भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी अशी कामगिरी सचिन तेंडुलकर (२२७८ धावा) आणि सौरव गांगुली (१००६ धावा) यांनीच केली होती. विराटने २५ डावात १०२९ धावा केल्या.
विराटने केली सचिन, सिद्धूची बरोबरी
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. यासह त्याने सचिन तेंडुलकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या एका विक्रमाची बरोबरी केली. विश्वचषक स्पर्धेत त्याने सलग चार सामन्यात भारताकडून ५० पेक्षा जास्त धावा त्याने केल्या. शिवाय अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

विश्वचषकात हॅट्ट्रिक
अफगाणविरुद्ध निर्णायक क्षणी हॅटट्रिक घेऊन शमीने भारताला विजयी केले. विश्वचषकात तो हॅटट्रिक घेणारा दुसरा भारतीय ठरला. याआधी चेतन शर्माने १९८७ साली न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.


Web Title: India won the World Cup, but Vikrama has won the tournament
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.