India will take on New Zealand in the ICC World Test Championship Final from June 18th. | WTC Final : अव्वल स्थानासह टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; क्रिकेटच्या पंढरीत न्यूझीलंडशी भिडणार

WTC Final : अव्वल स्थानासह टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; क्रिकेटच्या पंढरीत न्यूझीलंडशी भिडणार

ठळक मुद्दे५२० गुणांसह टीम इंडिया WTCच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानीन्यूझीलंडच्या खात्यात ४२० गुण, इंग्लंड चौथ्या क्रमांकावर

भारतीय संघानं ( India vs England 4th Test) चौथ्या कसोटीत डावानं विजय मिळवला आणि इंग्लंडविरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकली. या विजयाबरोबरच टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा अंतिम सामना रंगणार आहे.  ICC World Test Championship Final from June 18th आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय


ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आणि कसोटी मालिका रद्द करावी लागली. त्याचा फटका त्यांनाच बसला आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) च्या अंतिम सामन्यासाठी भारत-इंग्लंड यांच्यातली मालिका उपांत्य फेरीचा सामना झाला. न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाही शर्यतीत राहिली. पण, ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर अवलंबून राहवे लागले होते. पण, टीम इंडियानं चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियालाही बाहेर फेकले.

टीम इंडियाचा एक डाव व २५ धावांनी विजय
India vs England, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sunder) हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं... ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) विजय मिळवून भारतानं मालिका ३-१ अशी खिशात घातली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी  १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India will take on New Zealand in the ICC World Test Championship Final from June 18th.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.