India vs West Indies : ख्रिस गेलची इच्छा अपूर्ण, कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

India vs West Indies Test : भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 11:27 AM2019-08-10T11:27:12+5:302019-08-10T11:27:37+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies Test : West Indies announce squad for Test series vs India; Rahkeem Cornwall earns maiden call-up, Gayle left out | India vs West Indies : ख्रिस गेलची इच्छा अपूर्ण, कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

India vs West Indies : ख्रिस गेलची इच्छा अपूर्ण, कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यांनी 26 वर्षीय राहकीम कोर्नवॉलला कसोटीत खेळण्याची संधी दिली आहे, तर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला वगळले आहे.  


वेस्ट इंडिज चॅम्पियन्सशिप आणि वेस्ट इंडिज अ संघाकडून खेळताना कोर्नवॉलने दमदार कामगिरी केली आहे. त्याने 55 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 23.90च्या सरासरीनं 260 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय फलंदाजीत 24 च्या सरासरीनं 1 शतक आणि 13 अर्धशतकंही नावावर केली आहेत.

''राहकीमने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अनेकदा त्यानं मॅच विनींग खेळीही केली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीचे फळ म्हणून त्याला कसोटी संघात समाविष्ठ केले आहे,'' असे वेस्ट इंडिज संघाचे निवड समितीचे प्रमुख रॉबर्ट हायनेस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''त्याच्या समावेशानं आमच्या गोलंदाजांची धार अधिक तीव्र होईल, असे वाटते. शिवाय तो तळाला फलंदाजीतही हातभार लावू शकतो.''

दरम्यान गेलला या संघात स्थान दिलेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान गेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्यापूर्वी एक कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता त्याची इच्छा अपूर्ण राहणार आहे.  

कसोटीसीठी वेस्ट इंडिजचा संघ 
जेन होल्डर ( कर्णधार ), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, राहकीम कोर्नवॉल, शेन डॉवरीच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.

कसोटीसाठी भारतीय संघ  -  
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

  • कसोटी मालिका

22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून
 

Web Title: India vs West Indies Test : West Indies announce squad for Test series vs India; Rahkeem Cornwall earns maiden call-up, Gayle left out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.