India vs West Indies : Shardul Thakur set to replace injured Bhuvneshwar Kumar for the ODI series | टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं?
टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच्या जागी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला. त्यात भर म्हणून आणखी एका खेळाडूला वन डे मालिकेला आता मुकावे लागण्याची शक्यता आहे. संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापतीनं पुन्हा ग्रासलं. त्यामुळे तो आता वन डे मालिकेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण, भुवीच्या जागी मुंबईच्या गोलंदाजाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भुवीच्या दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भुवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते, परंतु त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत अजून कोणताच धोका पत्करायचा नसल्यानं त्याला आगामी वन डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यात भुवनेश्वरला वैद्यकिय मदत घ्यावी लागली होती. भारतानं हा सामना 67 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.  त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, हे पाहीले जाईल. 

भुवीच्या जागी मुंबईचा गोलंदाज शार्दूल ठाकूरचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शार्दूलनं फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही विभागात साजेशी कामगिरी करून दाखवली आहे,

भारताय संघ वन डे - विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मयांक अग्रवाल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार/??, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल
वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 
 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक
वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक

Web Title: India vs West Indies : Shardul Thakur set to replace injured Bhuvneshwar Kumar for the ODI series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.