India vs West Indies: India's victory Over the West Indies easily in first T-20 match | India vs West Indies : भारताचा 'विराट' विजय; वेस्ट इंडिजवर सहज मात
India vs West Indies : भारताचा 'विराट' विजय; वेस्ट इंडिजवर सहज मात

ठळक मुद्देआता दुसरा सामना १० डिसेंबरला होणार आहे.

हैदराबाद : विराट कोहलीच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवला. विराटला यावेळी अर्धशतकवीर लोकेश राहुलची चांगली साथ मिळाली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना ८ डिसेंबरला होणार आहे. भारताने या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला. कोहलीने या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कोहलीने ५० चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ९४ धावांची तुफानी खेळी साकारली.

Image result for kohli century

वेस्ट इंडिजच्या २०८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या रुपात भारताला लवकर धक्का बसला. पण त्यानंतर राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. कोहलीपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले.

राहुलने यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील हजार धावा पूर्ण केल्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील हजार धावा पूर्ण करणाला तो भारताचा सातवा खेळाडू ठरला. पण र्धशतक झळकावल्यावर राहुलला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. राहुलने ४० चेंडूंत ५ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या.

Image result for kohli century

राहुल बाद झाल्यावर कोहली अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ले चढवले. 

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना झंझावाती फलंदाजी करत पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतापुढे 208 धावांचे आव्हान ठेवले होते.
भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईसने तुफानी फटकेबाजी करत फक्त १७ चेंडूंमध्ये ४० धावांची लूट केली. त्याला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. लुईसनंतर वेस्ट इंडिजचा शिमरोन हेटमायर चांगलाच तळपला. हेटमायरने षटकारासह आपले अर्धशतक दिमाखात साजरे केले. हेटमारने ४१ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावा केल्या हेटमायर बाद झाल्यावर एका चेंडूनंतर किरॉन पोलार्डही ३७ धावांवर बाद झाला. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हे दोन्ही बळी मिळवून दिले.

भारताचा लोकेश राहुलचा विक्रम; ठरला हजारी मनसबदार
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम रचला आहे. या सामन्यामध्ये राहुल हा हजारी मनसबदार ठरला आहे.

या सामन्यात राहुलने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा पल्ला गाठणारा तो सातवा खेळाडू ठरला.

'बर्थ डे बॉय'ने मिळवून दिले भारताला मोठे यश
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आपल्या वाढदिवशी एका खेळाडूने भारताला मोठे यश मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूने हा बळी मिळवत स्वत:लाच स्पेशल गिफ्ट दिले आहे.

वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईसने संघाला झोकात सुरुवात करून दिली. लुईस बाद झाल्यावर शिमरोन हेटमायरल दमदार फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूने ब्रेंडन किंग भारताच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करत होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजाने त्याचा काटा काढला. किंगला यावेळी ३१ धावांवर जडेजाने बाद केले. आज जडेजाचा वाढदिवस आहे.
 

Web Title: India vs West Indies: India's victory Over the West Indies easily in first T-20 match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.