India vs West Indies, ICC World Cup 2019 : Rohit Sharma OUT or NOT OUT? Terrible decision by Third umpire | India vs West Indies : रोहित शर्मा OUT की NOT OUT? हिटमॅनला ढापले?
India vs West Indies : रोहित शर्मा OUT की NOT OUT? हिटमॅनला ढापले?

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लवकरच धक्का बसला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( 18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतला. केमार रोचच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक शे होप्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण, त्याला बाद देण्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. 
त्यात चेंडू बॅट अन् पॅडच्या मधून जाताना दिसत होता. पण, तो बॅटीला चाटून गेली की पॅडला याबाबत स्पष्टता नव्हती, तरीही तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिले आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली. Web Title: India vs West Indies, ICC World Cup 2019 : Rohit Sharma OUT or NOT OUT? Terrible decision by Third umpire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.