India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट

नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 07:35 PM2019-08-22T19:35:28+5:302019-08-22T19:36:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 1st Test: Rohit Sharma's excluded from first test | India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट

India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण पहिल्या सामन्यासाठी रोहितचा विचार केला नसल्याचेच दिसते. कोहलीने यावेळी हनुमा विहारीला सलामीला न पाठवता लोकेश राहुलला संधी दिल्याचेही पाहायला मिळाले. रोहितचा विचार न करता कोहलीने राहुलला संधी दिल्याचेच पाहायला मिळाले.


फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधान
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला बाऊन्सर लागला आणि तो मैदानातच कोसळला. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्यानंतर स्मिथला मैदानात येता आले नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यालाही स्मिथला मुकावे लागले. पण आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक अजब विधान केले आहे. ' फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सरचा झटका बसावा, ' असे विधान कोहलीने केले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहीलीची एक खास मुलाखत झाली. ही मुलाखत वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज सर विवियन रीचर्ड्स यांनी घेतली. यावेळी रीचर्ड्स यांनी आपण कधीच हल्मेट का घातले नाही, याबाबत खुलासा केला. त्यानंतर कोहलीने अजब विधान केल्याचे पाहायला मिळाले.

कोहली म्हणाला की, " जेव्हा मी मैदानात पोहोचेन तेव्हा लगेचच मला बाऊन्सर टाकला जावा. कारण डावाच्या सुरुवातीला बाऊन्सर आला तर त्यानंतर तुम्ही अधिक इर्षेने मैदानात उतरता. त्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच बाऊन्सर लागायला हवा."

टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?
ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक मालिकेला 120 गुण दिले जाणार आहेत आणि त्यात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ गुणतालिकेत आगेकूच करत राहणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात या 120 गुणांसाठीची शर्यत आजपासून सुरू होणार आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना उद्यापासून खेळणार आहे. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.  अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल. या स्पर्धेतील भारतीय मोहिमची सुरुवात आजपासून होत आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. त्यानुसार विजयी संघाला 60 गुण मिळतील. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. आता या 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. त्यात श्रीलंकेने 60 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते 32 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडने खाते उघडले आहे आणि ते 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

Web Title: India vs West Indies, 1st Test: Rohit Sharma's excluded from first test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.