India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियाने धो डाला... श्रीलंकेसमोर उभं केलं मोठं आव्हान

भारतानं अखेरच्या 4 षटकांत 59 धावा चोपून काढल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 08:42 PM2020-01-10T20:42:34+5:302020-01-10T20:46:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka, 3rd T20I : India post 201/6 at the end of their 20 overs | India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियाने धो डाला... श्रीलंकेसमोर उभं केलं मोठं आव्हान

India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियाने धो डाला... श्रीलंकेसमोर उभं केलं मोठं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. धवन आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पण, आघाडीवर खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांनी निराश केले. कर्णधार विराट कोहलीनं सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची चांगली साथ मिळली आणि टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारली.

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज

पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि मनीष पांडे यांना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कुलदीप यादव, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली. पहिला पॉवर प्ले टीम इंडियाच्या बाजूनं राहिला. दुसऱ्याच षटकात मिळालेल्या जीवदानानंतर शिखर धवननं सावध खेळ केला. पण, दुसऱ्या बाजूनं लोकेश राहुलनं फटकेबाजी केली. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाल्यानंतर धवनही रंगात आला. त्यानेही श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडियासाठी 63 धावा जोडल्या. 

धवनने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, लक्षण संदाकनच्या गोलंदाजीवर धवन बाद झाला. धवनने 36 चेंडूंत 52 धावा केल्या. गब्बर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. सॅमसनचा हा फटका पाहून डगआउटमध्ये बसलेला कोहलीही उभा राहून टाळ्या वाजवू लागला. पण, दुसऱ्याच चेंडूवर संजू पायचीत होऊन माघारी परतला. वनिंदू हसरंगानं त्याला बाद केले. 

लोकेश राहुल खेळपट्टीवर जम बसवून होता. त्यानंही 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्यानं संदाकनच्या पुढच्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला, पण लगेच पुढील चेंडूवर तो यष्टिचीत झाला. श्रेयस अय्यरनं पहिल्या चेंडूवर चौकार मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाच्याच हातात झेल देऊन तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. त्यानंतर कोहली आणि मनीष पांडे यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. विराट बाद झाल्यानंतर मनीषनं संघाला मोठा पल्ला गाठून दिला. शार्दूल ठाकूरनं पुन्हा एकदा फलंदाजीत कमाल दाखवली. भारतानं 20 षटकांत 6 बाद 201 धावा करून लंकेसमोर विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य ठेवले. 

विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

Web Title: India vs Sri Lanka, 3rd T20I : India post 201/6 at the end of their 20 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.