India vs South Africa : कोहलीवर आली तोंड लपवण्याची वेळ, पराभवामुळे नाही तर या कारणामुळे...

क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला विजय मिळवून दिला.  या दोघांनी रचलेल्या पायावर आफ्रिकेनं विजय साजरा केला अन् मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:11 AM2019-09-23T08:11:25+5:302019-09-23T08:12:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa : Virat Kohli miss DRS in 3rd T20I against South Africa; fan's trolled him | India vs South Africa : कोहलीवर आली तोंड लपवण्याची वेळ, पराभवामुळे नाही तर या कारणामुळे...

India vs South Africa : कोहलीवर आली तोंड लपवण्याची वेळ, पराभवामुळे नाही तर या कारणामुळे...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला विजय मिळवून दिला.  या दोघांनी रचलेल्या पायावर आफ्रिकेनं विजय साजरा केला अन् मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या घरच्या मैदानावर विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या. 

या सामन्यात भारताच्या फलंदाजांना अपयश आले. सलामीवीर शिखर धवन ( 36) वगळला, तर अन्य कुणालाही यापेक्षा मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या पाच षटकांत खेळपट्टीवर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा असूनही भारतीय संघ कसाबसा 134 धावांपर्यंतच मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. पण, भारतीय गोलंदाजांना तसे करता आले नाही. 

डी कॉक आणि हेंड्रीक्स यांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं 11व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानं हेड्रीक्सला बाद केले. कोहलीनं सुपर कॅच घेत हेंड्रीक्सला माघारी पाठवले. क्विंटन डी कॉकनं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. डी कॉकनं कर्णधार म्हणून सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. पण, या सामन्याचे चित्र पालटले असते. सामन्याच्या 6व्या षटकात दीपक चहरने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर हेंड्रीक्सच्या पायचीतची अपील झाली. पंचांनी चहर व यष्टिरक्षक रिषभ पंतच्या अपीलला दाद दिली नाही. त्यानंतर कोहलीनं चहरचा आत्मविश्वास पाहून DRS घेतला. पण चेंडू तिसऱ्या स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आणि कोहलीनं आपलं तोंड लपवले.

कोहलीनं चुकीचा DRS घेतला आणि त्याचा फटका टीम इंडियाला बसला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर डी कॉक बाद होता, परंतु टीम इंडियाने DRS गमावला असल्यानं आफ्रिकेच्या कर्णधाराला जीवदान मिळाले.


 

Web Title: India vs South Africa : Virat Kohli miss DRS in 3rd T20I against South Africa; fan's trolled him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.