India vs South Africa : विराट कोहली 'क्रिकेटच्या देवा'चा आणखी एक विक्रम मोडणार, आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचणार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : न्यूझीलंड दौऱ्यातील अपयशानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 04:36 PM2020-03-10T16:36:18+5:302020-03-10T16:37:59+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa : Virat Kohli likely to surpass Sachin Tendulkar to become fastest to 12,000 ODI runs during South Africa series svg | India vs South Africa : विराट कोहली 'क्रिकेटच्या देवा'चा आणखी एक विक्रम मोडणार, आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचणार

India vs South Africa : विराट कोहली 'क्रिकेटच्या देवा'चा आणखी एक विक्रम मोडणार, आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : न्यूझीलंड दौऱ्यातील अपयशानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ११ डावांमध्ये २१८ धावा करता आल्या होत्या. न्यूझीलंड दौऱ्यात ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी मालिकांमध्ये विराटला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले. पण, हे अपयश मागे टाकून आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराटची बॅट पुन्हा तळपण्यासाठी सज्ज आहे. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर १५ आणि १८ मार्चला सामने होतील. ३१ वर्षीय विराटला या मालिकेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. या मालिकेत विराटनं १३३ धावा केल्यास वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या १२ हजार धावा पूर्ण होतील. विराटनं ही कामगिरी करताच तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला जाईल. 

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर होईल. विराटच्या नावावर २३९ डावांमध्ये ११८६७  धावा आहेत. तेंडुलकरने ३०० डावांमध्ये १२ हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ( ३१४ डाव), श्रीलंकेचा कुमार संगकारा ( ३३६ डाव), श्रीलंकेचा सनथ जयसूर्या ( ३७९ धावा) आणि श्रीलंकेचा महेला जयवर्धने ( ३९९ डाव) यांचा क्रमांक येतो.  

भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुबमन गिल

दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक ( कर्णधार), टेंबा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, फॅफ ड्यू प्लेसिस, कायले व्हेरेयने, हेनरीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपाम्ला, बेयूरन हेंड्रीक्स, अॅनरीच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज

वन डे 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 12 मार्च, धर्मशाला
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 15 मार्च, लखनौ
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 18 मार्च, कोलकाता
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!

Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

Mumbai Indiansच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत, ट्वेंटी-२० लीगमधून माघार

WADAला धक्का; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला द्यावी लागली साडेतीन कोटींची भरपाई

फ्रँचायझी मालकांचे बंड? शाहरुख खान, अंबानीसह सर्वांचा 'त्या' निर्णयाला विरोध

Web Title: India vs South Africa : Virat Kohli likely to surpass Sachin Tendulkar to become fastest to 12,000 ODI runs during South Africa series svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.