India vs South Africa : भारतीय महिलांचा आफ्रिकेवर रोमहर्षक विजय, मालिकेत निर्भेळ यश

भारतीय महिला संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर शरणागती पत्करली, परंतु गोलंदाजांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:04 PM2019-10-14T16:04:08+5:302019-10-14T16:04:36+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa : India women win the thriller to complete a 3-0 sweep on South Africa women | India vs South Africa : भारतीय महिलांचा आफ्रिकेवर रोमहर्षक विजय, मालिकेत निर्भेळ यश

India vs South Africa : भारतीय महिलांचा आफ्रिकेवर रोमहर्षक विजय, मालिकेत निर्भेळ यश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय महिला संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर शरणागती पत्करली, परंतु गोलंदाजांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. पहिले दोन सामने सहज खिशात घालणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात जेमतेम 146 धावा करता आल्या. हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी तळाला दमदार फलंदाजी करताना भारताला 6 बाद 71वरून समाधानकारक पल्ला गाठून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांचीही घसरगुंडी झाली होती, परंतु कर्णधार सून लूस आणि मॅरिझन्ने कॅप यांनी डाव सावरला. पण, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना 6 धावांनी विजय मिळवून दिला. भारतानं ही मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. भारताने प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर व्हाईटवॉश मिळवला.

IT'S ALL OVER! INDIA WIN BY 6 RUNS, TAKE THE SERIES 3-0!

Jemimah Rodrigues picks her maiden international wicket, as Tumi Sekhukhune edged one to Deepti Sharma at slip. Sets off wild celebrations.

South Africa have thrown a game that was theirs.

SA 140/10 (48)#INDvSApic.twitter.com/UqoMW2Jygy

— Women's CricZone (@WomensCricZone) October 14, 2019

नाणेफेक जिंकून कर्णधार मिताली राजनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून विक्रमाची नोंद करणारी प्रिया पुनिया दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही. पहिल्याच षटकात शबनीम इस्मैलनं तिला झेलबाद केले. त्यानंतर पुढील षटकात मॅरिझन्ने कॅपनं जेमिमा रॉड्रीग्जला बाद केले. पूनम राऊत आणि मिताली संघाचा डाव सावरेल असे वाटले होते, परंतु त्यांनाही अपयश आले. पूनम ( 15) व मिताली ( 11) झटपट माघारी परतले.

हरमनप्रीत कौर एका बाजूनं खिंड लढवत होती. कौरला शिखा पांडेनं चांगली साथ दिली. दोघींनी सातव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. कौरनं 76 चेंडूंत 5 चौकारांसह 38 धावा केल्या. पांडेनं 40 चेंडूंत 6 चौकारांसह 35 धावा केल्या. आफ्रिकेच्या कॅपनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर इस्मैल व अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

146 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचे पाच फलंदाज 63 धावांवर तंबूत परतले होते. एकता बिस्त, राजेश्वरी गायकवाड यांनी आफ्रिकेच्या डावाला सुरूंग लावला. पण, लूस आणि कॅपनं चीवट खेळ केला. लूसनं 24, कॅपनं 29 धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 140 धावांत माघारी परतला.

Web Title: India vs South Africa : India women win the thriller to complete a 3-0 sweep on South Africa women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.