India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:07 AM2019-10-03T11:07:37+5:302019-10-03T11:08:29+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st Test : 300 runs partnership up between Rohit Sharma and Mayank Agarwal, only the third time by any opening pair in Test cricket | India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. त्यानं 209 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं पहिल्या शतकाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. यासह मयांक आणि रोहित या जोडीनं 300+ धावांची सलामी देत विक्रमाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही भारतीय सलामीवीरांना न जमलेला पराक्रम रोहित-मयांकने करून दाखवला. 

रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान

मयांक - रोहितनं विक्रम रचला, सेहवाग-गंभीरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

दुसरी धाव अन् रोहित-मयांकने मोडला 83 वर्षांपूर्वीचा विक्रम

बिनबाद 202 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना या जोडीनं दुसरी धाव घेताच नव्या विक्रमाची नोंद केली. या जोडीनं 83 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आणि भारताकडून सलामीला सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या जोडीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले. रोहितने दिवसाच्या तिसऱ्याच चेंडूवर चौकार खेचून हा विक्रम केला. गुरुवारी दुसऱ्या दिवशी या जोडीनं दुसरी धाव घेताच 1936सालचा विक्रम मोडला. भारताकडून सलामीला सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या जोडीत रोहित-मयांकने दहाव्या स्थानी झेप घेतली. 

रोहित शर्माच्या 150 धावा, भारताच्या 300 धावा

त्यांनी 204 धावांची भागीदारी करताच विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 1936च्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे 203 धावांची सलामी दिली होती. पण, दहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप मारण्यासाठी रोहित-मयांकला अवघी 21 षटकं लागली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम या जोडीनं नावावर केला. त्यांनी 2008च्या राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवागचा 268 धावांचा विक्रम मोडला.  या विक्रमात विनू मंकड आणि पंकज रॉय हे अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 1956मध्ये चेन्नई कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 413 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर राहुल द्रविड आणि सेहवाग ( 410 वि. पाकिस्तान, 2006) यांचा क्रमांक येतो. 

मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास

रोहित कसोटीत घरच्या मैदानावर कोहलीपेक्षा बेस्ट? आकडेवारी पाहा अन् ठरवा

वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं

तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'

हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी

रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर

रोहित शर्माची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; पाहा आकडेवारी

Web Title: India vs South Africa, 1st Test : 300 runs partnership up between Rohit Sharma and Mayank Agarwal, only the third time by any opening pair in Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.