IND Vs SL 2nd ODI Live : दीपक चहरचा 'कहर'; श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय!

IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला होता. पण, दीपक चहर व भुवनेश्व कुमार सॉलिड खेळले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:22 PM2021-07-20T23:22:41+5:302021-07-20T23:28:46+5:30

whatsapp join usJoin us
India vs SL 2nd ODI live : India have beaten Sri Lanka by 3 wickets and go 2-0 up in the series, Hats off to Deepak Chahar. Great innings! | IND Vs SL 2nd ODI Live : दीपक चहरचा 'कहर'; श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय!

IND Vs SL 2nd ODI Live : दीपक चहरचा 'कहर'; श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे दीपकनं ८२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या. भुवीनं नाबाद १९ धावा करून त्याच्यासह ८व्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.

IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला होता. सूर्यकुमार यादवनं वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना कृणाल पांड्यासह टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् श्रीलंकेचा संघ निर्धात होऊन, विजय आपलाच असा बागडू लागला. पण, दीपक चहरनं त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडवला. त्यानं वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना उपकर्णधार भुवनेश्वर कुमारसह संघर्ष केला. प्रचंड दडपणातही चहरनं अफलातून खेळी केली.  ४७व्या षटकात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले, तरीही त्यानं संघर्ष केला. ७ बाद १९३ वरून दीपक-भुवीनं सामना खेचून आणला. या दोघांमुळे श्रीलंकेच्या ताफ्यात 'कभी खूशी, कभी गम' असे वातावरण झाले. 

अविष्का फर्नांडो ( ५०) आणि मिनोद भानूका ( ३६) यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. धनंजया डी सिल्व्हा ( ३२), चरिथ असलंका ( ६५) आणि चमिका करुणारत्ने ( ४४*) यांनी श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण, तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू वनिंदू हसरंगानं त्याचा त्रिफळा उडवला. पृथ्वीला १३ धावांवर माघारी जावं लागलं. इशान किशनही ( १) फेल ठरला.  मनिष पांडे व शिखर यांनी सावध खेळ करताना टीम इंडियाची धावसंख्या हलती ठेवली. पण, वनिंदूनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला, त्यानं धवनला २९ धावांवर पायचीत पकडले. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd ODI


मनिष पांडे व सूर्यकुमार यादव यांनी झटपट खेळी करताना धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मनिष चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु दुर्दैवीरितीनं त्याला माघारी जावं लागलं. शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला, पण शनाकाच्या हाताला लागून तो नॉन स्ट्रायकर एंडला यष्टींवर आदळला. मनिष क्रिजच्या बाहेर आला होता आणि तिसऱ्या अम्पायरनं त्याला बाद ठरवले. त्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याचा रिटर्न कॅच शनाकाकडून सुटला. मनिष ३१ चेंडूंत ३ चौकारांसह ३७ धावांवर बाद झाला. पण, पुढच्याच षटकात हार्दिक झेलबाद झाला. Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates


सूर्यकुमारनं अर्धशतक पूर्ण करत टीम इंडियाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या, परंतु लक्षण संदकन यानं त्याला पायचीत पकडले. सूर्या ४४ चेंडूंत ६ चौकारांसह ५३ धावांवर बाद झाला. कृणाल पांड्याकडून अखेरच्या होप्स होत्या, परंतु हसरंगानं त्याला पायचीत केले. कृणाल ३५ धावांवर बाद झाला अन् टीम इंडियाच्या पुनरागमनाच्या आशाही मावळल्या होत्या.  भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांनी श्रीलंकेच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण केलं. चहर सुसाट सुटला, प्रचंड आत्मविश्वासानं तो श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यानं ६६ चेंडूंत वन डेतील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. वन डे क्रिकेटमध्ये ८ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करून अर्धशतक झळकावणारा चहर हा भारताचा ११वा खेळाडू ठरला. 

४७च्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिरक्षकाकडून भुवीचा झेल सूटला अन् चेंडू सीमापार गेला. भारताला २४ चेंडूंत २९ धावा हव्या होत्या आणि तेव्हा हा चौकार मिळाला. मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं दीपकनं प्रथोमचार घेतले, परंतु संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. अखेरच्या तीन षटकांत संघाला १६ धावा हव्या होत्या. ४८व्या षटकात केवळ एक धाव घेता आली. वनिंदू हसरंगानं १० षटकांत ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. १२ चेंडूंत १५ धावांची गरज असताना भुवीनं पहिल्या चेंडूवर एक धाव काढली अन् दीपकनं पुढच्या चेंडूवर चौकार खेचला. अखेरच्या षटकात टीम इंडियानं विजयासाठी असलेल्या ३ धावा सहज काढल्या.   दीपकनं ८२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या. भुवीनं नाबाद १९ धावा करून त्याच्यासह ८व्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.
IND Vs SL 2021, IND VS SL Live ODI Match Today, IND VS SL Live 2nd ODI  

Web Title: India vs SL 2nd ODI live : India have beaten Sri Lanka by 3 wickets and go 2-0 up in the series, Hats off to Deepak Chahar. Great innings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.