India vs Pakistan, World Cup 2019: Chris Gayle's get new dress for India-Pakistan match | India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ख्रिस गेलचा भन्नाट सुट
India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ख्रिस गेलचा भन्नाट सुट

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान हा सामना फक्त या दोन देशांपुरता मर्यादीत राहिलेला नाही. तर क्रिकेट जगतामध्ये या सामन्याची उत्सुकता आहे. आता तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने तर भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खास सुट शिवला आहे. गेलचा हा सुट आहे तरी कसा, ते पाहाभारत-पाकिस्तान सामन्याबद्दल विराट कोहली म्हणतो...
भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्वात महत्वाचा सामना उद्या मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्याकडे साऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिशषेला कर्णधार विराट कोहली आला होता. यावेळी तो नेमकं काय म्हणाला, ते वाचा...

या सामन्यामध्ये कोहलीपुढे पाकिस्तानाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचे मोठे आव्हान असेल, असे म्हटले जाते. पण कोहलीला मात्र, असे काहीच वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, " मोहम्मद आमीरवर मी लक्ष केंद्रीत केलेले नाही. संघातील अकरा खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर संघाचा विजय अवलंबून असतो. माझ्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे."

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याविषयी कोहली म्हणाला की, " भारत-पाकिस्तन सामन्याला चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. एक वेगळेच वातावरण तयार होते. पण आमच्यासाठी मात्र हा एक सामनाच असतो. कारण आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. त्यामुळे आमच्यासाठी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे देश सारखेच असतात. "


Web Title: India vs Pakistan, World Cup 2019: Chris Gayle's get new dress for India-Pakistan match
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.