India vs Pakistan : महामुकाबला होण्यापूर्वी पाकिस्ताननं युद्ध छेडलं; 'मौका मौका'ला उत्तर देताना टीम इंडियाला डिवचलं, Video 

आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan हे ७ वेळा भिडले, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा भिडले आणि भारतानेच बाजी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 05:26 PM2021-10-16T17:26:36+5:302021-10-16T17:27:35+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan : No Issue Lelo Tissue , Pakistan's response to the latest Mauka Mauka advertise T20 World Cup, Video | India vs Pakistan : महामुकाबला होण्यापूर्वी पाकिस्ताननं युद्ध छेडलं; 'मौका मौका'ला उत्तर देताना टीम इंडियाला डिवचलं, Video 

India vs Pakistan : महामुकाबला होण्यापूर्वी पाकिस्ताननं युद्ध छेडलं; 'मौका मौका'ला उत्तर देताना टीम इंडियाला डिवचलं, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होत आहे. राऊंड १चे सामने सुरुवातीला खेळवण्यात येणार असून २३ ऑक्टोबरपासून सुपर १२च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यात २४ तारखेला भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट वाहिनीनं पुन्हा एका ' Mauka Mauka' ही जाहीरात आणून पाकिस्तानी चाहत्यांना डिवचले आहे. पण, यावेळी पाकिस्तानकडूनही त्याला सडेतोड उत्तर मिळाले आहे. पाकिस्ताननंही India vs Pakistan लढतीसाठी एक गाणं तयार केलं आणि त्यात त्यांनी टीम इंडियाला डिवचलं आहे. आता प्रत्यक्षात कोणता संघ बाजी मारतो हे २४ ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.

आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ ७ वेळा भिडले, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा भिडले आणि भारतानेच बाजी मारली. चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र ५ पैकी २ सामने भारतानं जिकंल, तर तीनमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली आहे. आयसीसी स्पर्धांमधील दोन्ही संघांतील जय-पराजयाची आकडेवारी पाहता भारताचे पारडे १४-०३ असे जड आहे.  Star Sportsनं पुन्हा एकदा ‘Mauka Mauka’ ची जाहीरात आणली आहे आणि  यावेळी त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांसाठी Bye 1 Break 1 Free ऑफर ठेवली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत-पाकिस्तान पाच वेळा भिडले आणि पाचही वेळेस भारतानं बाजी मारली. यावेळी पाकिस्तानचा संघ बाजी मारेल, असे दावे त्यांच्या आजी-माजी खेळाडूंकडून केले जात आहेत.


या जाहीरातीला उत्तर म्हणून पाकिस्ताननं एक जाहीरात आणली आहे आणि त्यात त्यांनी no issue lelo tissue या थिमचा वापर केला आहे.

Web Title: India vs Pakistan : No Issue Lelo Tissue , Pakistan's response to the latest Mauka Mauka advertise T20 World Cup, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.