India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : virat kohli stands 57 runs short breaking sachin tendulkars yet another record | India Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे
India Vs Pakistan, Latest News: विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आज होणाऱ्या लढतीवर पावसाचे सावट आहे. जर हा सामना झालाच, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे पाकविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. 

कोहलीला वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे. जर आज त्यानं 57 धावा केल्यास तर 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरेल. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.
 


Web Title: India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : virat kohli stands 57 runs short breaking sachin tendulkars yet another record
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.