India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Shoaib Malik, Other Pak Players Seen With Sania Mirza at Shisha Café Night Before India Match; Fans Lash Out | India vs Pakistan : हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर!
India vs Pakistan : हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर!

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 7 वेळा आमने- सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला आहे. मात्र रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.  या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवाचं खापर पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झावर फोडले. पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकची पत्नी असलेल्या सानियानेही नेटिझन्सला त्यांच्या भाषेत सडेतोड उत्तर दिले.भारतविरुद्धच्या लढतीच्या एकदिवस आधी सानिया पती शोएबसह एका कॅफेमध्ये डिनरसाठी गेली होती. यावेळी पाकिस्तानचे काही खेळाडूही होते. त्यावरून नेटिझन्सने पाक खेळाडूंसह सानियावरही टीका केली. त्यावरून सानियानेही प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली,''एखाद्या व्यक्तिचा खासगी व्हिडीओ असा जाहीर करणं चुकीचं आहे. हो आम्ही डिनरसाठी गेलो होतो आणि मॅच पराभूत झाल्यावरही खेळाडूंना जेवण्याचा हक्क असतो. मुर्खांचा बाजार मांडला आहे. पुढच्यावेळी टीका करण्यासाठी काही तरी नवीन गोष्ट शोधून आणा.''  


Web Title: India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Shoaib Malik, Other Pak Players Seen With Sania Mirza at Shisha Café Night Before India Match; Fans Lash Out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.