India Vs Pakistan, ICC World Cup 2019, Latest News : It was quite the party at Manchester, the bharat army put on their dancing shoes ahead of India vs Pakistan match | India Vs Pakistan, Latest News: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच चाहत्यांची पार्टी, पाहा स्पेशल व्हिडीओ!
India Vs Pakistan, Latest News: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच चाहत्यांची पार्टी, पाहा स्पेशल व्हिडीओ!

India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन दिवसांपूर्वीच दोन्ही देशांचे चाहते मँचेस्टर येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे मँचेस्टरमध्ये सध्या दोनच रंग पाहायला मिळत आहेत, एक तर निळा आणि हिरवा... या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी चाहत्यांच्या उत्साहात किंचितशीही कमी झालेली नाही. या लढतीपूर्वी चाहत्यांनी एकत्र मिळून पार्टी केली. पाहा त्याचा व्हिडीओ...भारत-पाक सामन्याचे पास हवेत, विराट कोहलीचा खास मॅसेज!
क्रिकेट सामना कोणताही असो, तो याची देही याची डोळा पाहायला कोणाला आवडणार नाही? त्यात जर तो सामना भारत व पाकिस्तान या कट्टर वैऱ्यांमध्ये असेल तर... वर्ल्ड कप स्पर्धेत आज हे सख्खे शेजारी एकमेकांना भिडणार आहेत. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर हा सामना पाहण्यासाठी केवळ उभय देशांतूनच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहते येथे दाखल झाले आहेत. अनेकांना या सामन्याची तिकीटं मिळालेली नाहीत, त्यामुळे ते निराश झाले आहेत. पण, कोणीतरी या सामन्याची पासेस द्यावी अशी भाबडी आशा त्यांना आहे. पासेससाठी प्रयत्नही करत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्यांच्यासाठी खास संदेश पाठवला आहे.


''वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी तुम्ही जेव्हा घर सोडता, तेव्हा तुम्हाला आयोजकांना त्याची कल्पना द्यावी लागते. आम्ही येऊ का, असे माझे मित्र मला विचारत होते. मी त्यांना सांगितलं, 'तुम्हाला यायचंय तर या अन्यथा घरच्या टीव्हीवरच सामन्याचा आनंद लुटा.' एकदा का तुम्ही पास द्यायला सुरुवात केली, की त्याचा चुकीचा पायंडा पडतो. मग दोनाचे चार, चाराचे आठ होत जातात. आम्हाला ठरावीक पास मिळतात आणि त्यात कुटुंबीयांना आम्ही प्राधान्य देतो. त्यामुळे पाससाठी विचारणा केल्यास आवडत नाही,'' असे कोहलीनं सांगितले. 


Web Title: India Vs Pakistan, ICC World Cup 2019, Latest News : It was quite the party at Manchester, the bharat army put on their dancing shoes ahead of India vs Pakistan match
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.