India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 7 वेळा आमने- सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला आहे. मात्र रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.  या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. यापूर्वी भारताने पाकिस्तानला 1992च्या वर्ल्ड कपमध्ये 43 धावांनी, 1996 साली 39 धावांनी, 1999 मध्ये 47 धावांनी, 2003 मध्ये 6 विकेट्सने, 2011मध्ये 29 धावांनी आणइ 2015 मध्ये  76 धावांनी पराभूत केले होते.  


रोहित शर्माचे खणखणीत शतक आणि त्याला लोकेश राहुल व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीची मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 336 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादवनं पाकिस्तानच्या डावाला कलाटणी देत भारताचा विजय पक्का केला. भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आघारे 89 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहितनं 140 धावांची खेळी करत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. रोहितने 113 चेंडूंत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने चोपल्या 140 धावा चोपल्या. त्यानं लोकेश राहुलसह सलामीला 136 धावांची विक्रमी भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.
या सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या रोहितला पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,'' पाकिस्तानचा मी प्रशिक्षक बनेन तेव्हा मी त्यांच्या फलंदाजांना सल्ला देईन, आता नाही.''

पाहा व्हिडीओ...


'हिटमँन' रोहितचा 'तो' हिट पाहून सगळ्यांनाच 'सुपरहिट' सचिन आठवला!
रोहितने 113 चेंडूंत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने चोपल्या 140 धावा चोपल्या. त्यानं लोकेश राहुलसह सलामीला 136 धावांची विक्रमी भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहितनं या खेळीदरम्यान 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील तेंडुलकरनं पाकच्या शोएब अख्तरला मारलेल्या अपरकटची आठवण करून देणारा फटका मारला. हसन अलीच्या शॉर्ट पीच चेंडूवर रोहितनं अपरकट मारत खणखणीत षटकार ठोकला. 16 वर्षांपूर्वी तेंडुलकरनेही असाच अपरकट अख्तरच्या गोलंदाजीवर मारला होता. 
 


Web Title: India vs Pakistan, ICC World Cup 2019 : I'll tell them if I ever become the coach for Pakistan, Rohit Sharma
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.