India Vs Pakistan ICC World Cup 2019 cricket fans attended match with pm modi and shiv sena founder balasaheb thackeray photo | India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर
India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर

मुंब्रा : इंग्लंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान रविवारी भारत पाकिस्तानदरम्यान सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरमध्ये जगभरातून क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. हा अटीतटीचा सामना बघण्यासाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील संदेश भगत, राहूल पाटील आणि निलेश भोईर हेदेखील गेले होते. या क्रिकेटप्रेमींनी सामन्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असलेले बॅनर झळकवले.

या बॅनरवर हिंदूस्थानके दो शेर असे लिहिले होते. सामना बघताना त्यांनी परिधान केलेल्या आगरी टोप्या, तसेच एकंदरीत पेहेराव आकर्षक होता. सामना बघण्यासाठी आलेल्या इतर क्रि केट शौकिनांचे लक्ष या बॅनरने वेधून घेतले.


Web Title: India Vs Pakistan ICC World Cup 2019 cricket fans attended match with pm modi and shiv sena founder balasaheb thackeray photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.