India vs New Zealand, 2nd Test : 'भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल, तर 'ही' गोष्ट करावी लागेल'

पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता भारताने हा सामना बरोबरीत सोडवला तरी त्यांना मालिका गमवावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 06:28 PM2020-02-28T18:28:53+5:302020-02-28T18:30:35+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand, 2nd Test: 'If India wants to win another match,' this is the thing to do ' prl | India vs New Zealand, 2nd Test : 'भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल, तर 'ही' गोष्ट करावी लागेल'

India vs New Zealand, 2nd Test : 'भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल, तर 'ही' गोष्ट करावी लागेल'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया सामन्यात भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी विजय आवश्यकच आहे.

भारतासाठी सध्या करो या मरो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण हा सामना भारताने जिंकला नाही तर भारताला ही मालिका गमवावी लागणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता भारताने हा सामना बरोबरीत सोडवला तरी त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी विजय आवश्यकच आहे.

Image result for pujara and ajibnkya

हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने काही खास गोष्टी करायला हव्यात, असे एका माजी तंत्रशुद्ध सलामीवीराला वाटत आहे. जर भारताला हा सामना जिंकायचा असेल तर भारताच्या खेळाडूंनी नेमके काय करायला हवे, हेदेखील त्यांनी सांगितले आहे.

भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर म्हणाला की, " भारताला पहिल्या कसोटीत पराबव पत्करावा लागला. कारण या कसोटी सामन्यात भारताच्या धावा जास्त झालेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे भारताला जर दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांना जास्त धावा कराव्या लागतील." 

Image result for wasim jaffer

तो पुढे म्हणाला की, " भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. पण जर भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर कोहलीला जास्त धावा कराव्या लागतील. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचीही भूमिका महत्वाची असेल. भारताला जर सामना जिंकायचा असेल तर या तिघांपैकी एकाने शतक झळकावले पाहिजे. कारण एखादा खेळाडू जेव्हा शतक झळकावतो तेव्हा संघ तिनशे धावांच्या पुढे जाऊ शकतो. जर भारताला सामना जिंकायचा असेल तर त्यांना २००-२५० धावा करून चालणार नाहीत, तर त्यांना ३५०-४०० धावांचा विचार करायला हवा." 

भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे नेमके होणरा तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत शास्त्री यांनी मात्र मोठा खुलासा केला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. हा कसोटी सामना भारताने जिंकला नाही तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन खेळाडूंना संधी मिळेल, असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. 

दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. यापूर्वी झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत इशांतला दुखापत झाली होती. त्यामुळे इशांतला काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण आता या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. इशांतच्या जागी संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इशांतबरोबरच भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला आहे. पृथ्वी शॉने गुरुवारी सराव सत्रातून माघार घेतली होती. त्याच्या डाव्या पायाला सूज आल्याने त्याने हा निर्णय घेतला आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. पृथ्वीबाबत 
शास्त्री यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

पृथ्वी हा पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे मयांक अगरवालबरोबर पृथ्वी सलामीला येणार आहे. याबाबतचा खुलासा शास्त्री यांनी केला होता. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही याबाबतचे संकेत दिले होते.

Web Title: India vs New Zealand, 2nd Test: 'If India wants to win another match,' this is the thing to do ' prl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.