IND vs ENG: कोहलीनं इशान किशनसाठी सोडली आपली सर्वात आवडती गोष्ट; वर्षभरानंतर असं घडलं

India vs England, T20 : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनसाठी विराट कोहलीनं घेतला अनोखा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 09:22 PM2021-03-16T21:22:51+5:302021-03-16T21:23:49+5:30

whatsapp join usJoin us
india vs england virat kohli batting at number 4 after an year in international t20 | IND vs ENG: कोहलीनं इशान किशनसाठी सोडली आपली सर्वात आवडती गोष्ट; वर्षभरानंतर असं घडलं

IND vs ENG: कोहलीनं इशान किशनसाठी सोडली आपली सर्वात आवडती गोष्ट; वर्षभरानंतर असं घडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, T20: भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळाला. कोहलीनं नाणेफेकीवेळीच या संदर्भातील माहिती दिली होती. रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघं सलामीला उतरतील तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, असं कोहलीनं स्पष्ट केलं. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सामान्यत: विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो हे आपण पाहत आलो आहोत. पण इशान किशनसाठी विराटनं तिसरा क्रमांक सोडला आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (India vs England Virat Kohli Batting At Number 4 After An Year In International T20)

खरंतर कोहलीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधीही विराट कोहली १४ सामन्यांमध्ये १४ वेळा चौथ्या क्रमांरावर फलंदाजीसाठी आलेला आपण पाहिलं आहे. चौथ्या क्रमांकावरही कोहलीनं चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना विराटनं ४२.२० च्या सरासरीनं ४२२ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या आजच्या सामन्याआधी विराट कोहली वर्षभरापूर्वी जानेवारी २०२० मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाहायला मिळाला होता. त्यावेळी न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत ३८ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीचं करिअर चौथ्या क्रमांकापासूनच सुरू झालं होतं. 

भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर कोहलीचं तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजीचं स्थान जवळपास निश्चितंच होतं. भारतीय संघाची पहिली विकेट पडल्यानंतर मैदानात कोहलीचीच एन्ट्री होत आली आहे. पण भारतीय संघात सध्या विविध बदल करुन पाहिले जात आहेत. त्यात नव्या दमाच्या खेळाडूंनाही संधी दिली जात आहे. येत्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची चाचपणी इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत केली जातेय. 

कोहलीचं जबरदस्त टी-२० करिअर
कोहलीनं आतापर्यंत ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यात ५०.८६ च्या सरासरीनं ३००१ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये कोहलीनं आतापर्यंत २६ अर्धशतकं ठोकली आहेत. कोहलीनं सात सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी सलामीला देखील फलंदाजी केली आहे. तर एकदा पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी केलीय. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीनं २६ धावा केल्या होत्या. 
 

Web Title: india vs england virat kohli batting at number 4 after an year in international t20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.