India vs England T20I Series 2021: टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय?

Full List of Award Winners, Prize Money, Records इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६ धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 04:13 PM2021-03-21T16:13:19+5:302021-03-21T16:13:46+5:30

whatsapp join usJoin us
India vs England T20I Series 2021: Full List of Award Winners, Prize Money, Records | India vs England T20I Series 2021: टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय?

India vs England T20I Series 2021: टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माविराट कोहली या नव्या जोडीनं टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. रोहित ( ६४) व विराट ( ८०*)  या दोघांनी अर्धशतकी खेळी केली, तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या यांनीही हात धुवून घेतले. भारतानं २० षटकांत २ बाद २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात  जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाचं टेंशन वाढवलं होतं, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) मॅजिकल ओव्हर टाकली आणि टीम इंडियानं सामन्याला कलाटणी दिली. इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६ धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली.  कसोटी, ट्वेंटी-20 पाठोपाठ टीम इंडिया वन डेतही इंग्लंडला पाणी पाजणार?; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या सामन्यात ४ षटकांत १५ धावा देत २ विकेट्स घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारला ( Bhuvneshwar Kumar) मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. पाच सामन्यांत तीन अर्धशतकांसह २३१ धावा करणाऱ्या विराट कोहलीला मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार देण्यात आला. द्विदेशीय ट्वेंटी-२० मालिकेत २००+ धावा करणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला. त्यानं या मालिकेत २३१ धावा केल्या आहेत. ( Most runs by a captain in a bilateral T20I series). त्यानंतर अॅरोन फिंच ( १९७ धावा वि. ऑस्ट्रेलिया, २०२१) आणि इयॉन मॉर्गन ( १९२ धावा वि. न्यूधीलंड, २०१९) यांचा क्रमांक येतो. लोकेश राहुलचे अपयश हे टीम इंडियासाठी फायद्याचे ठरले; रोहित शर्मा-विराट कोहली जोडीबाबत सुनील गावस्कर स्पष्टच बोलले

पुरस्कार अन् त्यांना मिळालेली बक्षीस रक्कम (Award winners and prize money)

  • मॅन ऑफ दी मॅच - भुवनेश्वर कुमार - १ लाख
  • सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी - डेवीड मलान व जोस बटलर - १ लाख
  • सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू - रोहित शर्मा - १ लाख
  • मालिकेतील Hyundai I20 Turbo परफॉर्मर - विराट कोहली - नवी कोरी I20 Turbo कार
  • मालिकावीर - विराट कोहली - २.५ लाख

 
टीम इंडियाचे विक्रम ( Team records and stats ) विराट कोहलीची सामन्यानंतर मोठी घोषणा; टीम इंडियाचेच नव्हे, तर RCBचे चाहते झाले खूश

  • भारतीय संघानं सलग सहाव्या ट्वेंटी-२० मालिकेवर कब्ज केला. मागील ८ ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडिया अपराजित आहे.
  • भारतीय संघानं सर्वाधिक १८ वेळा ट्वेंटी-२० सामन्यात २००+ धावा करण्याचा पराक्रम केला.
  • २०० किंवा त्यापेक्षा अधिक लक्ष्याचा टीम इंडियानं १०वेळा यशस्वी बचाव केला.

Web Title: India vs England T20I Series 2021: Full List of Award Winners, Prize Money, Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.