रिषभ पंत कोरोनामुक्त, पण पहिल्या कसोटीत खेळणार का? BCCIने दिली महत्त्वपूर्ण अपडेट

Rishabh Pant News: रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:43 AM2021-07-22T11:43:45+5:302021-07-22T11:44:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Rishabh Pant recover from Coronavirus, but will he play in the first Test? Important update from BCCI | रिषभ पंत कोरोनामुक्त, पण पहिल्या कसोटीत खेळणार का? BCCIने दिली महत्त्वपूर्ण अपडेट

रिषभ पंत कोरोनामुक्त, पण पहिल्या कसोटीत खेळणार का? BCCIने दिली महत्त्वपूर्ण अपडेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठा धक्का बसला होता. दरम्यान, रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. बीसीसीआयने गुरुवारी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. बीसीसीआयने आज पहाटे ट्विट करून ही माहिती दिली आहे. ८ जुलै रोजी रिषभ पंतचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कौंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्याला तो मुकला होता. (India vs England) आता रिषभ पंत दुसरा सराव सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध आहे. (Rishabh Pant recover from Coronavirus, but will he play in the first Test? Important update from BCCI)

रिषभ पंतचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्या कसोटीमधील त्याच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता बीसीसीआयने त्याच्या तंदुरुस्तीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर रिषभ पंतचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याखाली हॅलो रिषभ पंत तू पत आल्याचे पाहून आनंद झाला, अशी कॅप्शन दिली आहे. डरहॅममध्ये भारतीय संघासोबत येण्यापूर्वी रिषभ पंत हा दहा दिस आयसोलेशनमध्ये होता. सराव सामन्यात त्याच्याऐवजी के.एल. राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच राहुलने भारतीय संघातील आपली दावेदारी भक्कम करताना शतकी खेळीही केली होती.

दुसरीकडे भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील थ्रोडाऊन तज्ज्ञ दयानंद जारानी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासून आतापर्यंत आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, अतिरिक्त यष्टिरक्षक ऋद्धिमाना साहा आणि आणि पर्यायी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन हे सुद्धा विलगीकरणात आहेत. हे तिघेही दयानंद यांच्या संपर्कात आले होते.

भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही पाच सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाची पुढच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली मालिका असेल. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेसाठीच्या तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवू इच्छित नाही. या मालिकेनंतर भारतीय संघ थेट यूएईमध्ये जाणार आहे. तिथे आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जातील.  

Web Title: India vs England: Rishabh Pant recover from Coronavirus, but will he play in the first Test? Important update from BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.