India VS England : कुलदीपला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळायला हवी - इरफान

India VS England: डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव वेगळ्या शैलीचा गोलंदाज असून त्याला इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत संधी मिळायला हवी, असे मत भारताची माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:27 AM2021-02-03T04:27:20+5:302021-02-03T04:27:31+5:30

whatsapp join usJoin us
India VS England: Kuldeep should get a chance in series against England - Irfan Pathan | India VS England : कुलदीपला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळायला हवी - इरफान

India VS England : कुलदीपला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळायला हवी - इरफान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव वेगळ्या शैलीचा गोलंदाज असून त्याला इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत संधी मिळायला हवी, असे मत भारताची माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने व्यक्त केले.

कुलदीप गेल्या तीन महिन्यात जास्तीत जास्त काळ बेंचवर बसावे लागेल, पण पठाण म्हणाला की, तो वेगळा गोलंदाज असून ५ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेत तो चांगली कामगिरी करेल.

पठाणने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कुलदीपचा संघात समावेश करण्याचे समर्थन करताना म्हटले, ‘तो वेगळा गोलंदाज आहे. तो २५-२६ वर्षांचा आहे आणि या वयात तो परिपक्वता मिळवू शकतो. त्याला जेव्हाही संधी मिळेल, मग तो पहिला कसोटी सामना असो किंवा दुसरा तो चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. त्यात तो यशस्वी ठरले, असा मला विश्वास आहे.’

भारतातर्फे २९ कसोटी व १२० वन-डे सामने खेळणार पठाण म्हणाला, ‘इंग्लंड संघाबाबत चर्चा करताना इतिहास बघितला तर तुम्ही जर लेगस्पिनर असाल तर तुमच्याकडे यश मिळविण्याची संधी असते. त्यामुळे त्याला जेव्हाही संधी मिळेल तो यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे.’
कुलदीपने आतापर्यंत सहा  कसोटी सामन्यात २४ बळी घेतले आहेत. त्याने आपला अखेरचा कसोटी सामना जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मालिकेपूर्वी संघाच्या संयोजनाबाबत बोलताना पठाण म्हणाला, चेन्नईच्या खेळपट्टीचे स्वरूप बघता तीन फिरकीपटूंसह खेळणे वाईट पर्याय ठरणार नाही. 

खेळपट्टीवर बरेचकाही अवलंबून असते, पण चेन्नईमध्ये तीन फिरकीपटूंना संधी मिळायला हवी. कारण चेन्नईची खेळपट्टी अतिरिक्त उसळी व फिरकीपटूंना अनुकूल मातीमुळे बनलेली आहे, पण खेळपट्टी फिरकीपटूंना कशी मदत करते याची उत्सुकता आहे.’
पठाणच्या मते वॉशिंग्टन सुंदर व अनुभवी रविचंद्रन अश्विन चारही कसोटी सामन्यात खेळू शकतात. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई आणि अखेरचे दोन सामने अहमदाबादमध्ये होतील.

पठाणच्या मते भारत या मालिकेत २-१ ने विजय मिळवेल. तो म्हणाला,‘निश्चितच भारत ही मालिका जिंकेल. त्यात कुठली शंका नाही. इंग्लंड संघाने अलीकडेच श्रीलंकेत चांगली कामगिरी केली आहे. तेथील खेळपट्ट्याही भारताप्रमाणेच आहेत. त्यांच्यासाठी ज्यो रुटची भूमिका महत्त्वाची ठरेल. इंग्लंडला रुटकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.

‘वाशिंग्टन सुंदर केवळ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नव्हे तर अष्टपैलू म्हणून संघात खेळेल. तो फार चांगली फलंदाजी करतो आणि भारतात अनुकूल परिस्थितीमध्ये फिरकीपटू म्हणूनही चांगली कामगिरी बजावू शकतो.’ 

‘संघ व्यवस्थापनाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. जे खेळाडू खेळत आहेत त्यांची मानसिकता ते कसे कायम राखतात याला विशेष महत्त्व आहे. माझ्या मते ते योग्य काम करीत आहे. त्यामुळेच युवा खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. मला विश्वास आहे की, कुलदीप यादवचे समर्थन करीत असतील कारण तो प्रतिभावान आहे. तुम्हाला रोज डावखुरा फिरकीपटू मिळत नाही.’               - इरफान पठाण

Web Title: India VS England: Kuldeep should get a chance in series against England - Irfan Pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.