India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. India vs England

By स्वदेश घाणेकर | Published: February 4, 2021 03:52 PM2021-02-04T15:52:25+5:302021-02-04T15:54:30+5:30

whatsapp join usJoin us
India vs England : Jasprit Bumrah will be playing a Test in India for the FIRST time  | India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे५ जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं कसोटी संघात पदार्पण केलं.त्यानं १७ कसोटी सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद २७ ( वि. वेस्ट इंडिज) ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-०असे लोळवून भारतात दाखल झाला आहे. भारतीय संघानंही ऑस्ट्रेलियात ऐतिहासिका २-१ असा मालिका विजय मिळवला आहे. त्यात या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात विराट कोहली, लोकेश राहुल, इशांत शर्मा हे प्रमुख खेळाडू परतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाची बाजू अजून मजबूत झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायबंदी झालेला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहही ( Jasprit Bumrah) चेन्नई कसोटीसाठी सज्ज झाला आहे. पण, हा कसोटी सामना बुमराहसाठी खास आहे. बुमराह पहिल्यांदाज भारतीय भूमित कसोटी सामना खेळणार आहे.  सचिन, रोहित, विराट हे रिहानाचे कान टोचत असताना संदीप शर्मानं घेतली तिची बाजू; पण...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. न्यूझीलंडनं पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान पटकावला. दुसऱ्या संघाच्या शर्यतीत भारत- इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ आहे. ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्या रद्द केला असला तरी भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ WTC फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी तयार आहेत. पण, या सामन्यात जसप्रीत बुमराहवर सर्वांचे लक्ष असेल. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका

५ जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं कसोटी संघात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज व न्यूझीलंड असे दौरे गाजवले. त्यानं १७ कसोटी सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद २७  ( वि. वेस्ट इंडिज) ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. आता बुमराह शुक्रवारी मैदानात उतरेल तेव्हा तो त्याचा मायदेशातील पहिलाच कसोटी सामना असेल. तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड!

Web Title: India vs England : Jasprit Bumrah will be playing a Test in India for the FIRST time 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.