India vs England, 2nd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकले पाहुणे, टीम इंडियाकडे मजबूत आघाडी 

IND vs ENG, 2nd Test Stumps on Day 2 : ( India lead by 249 runs) इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही आणि आर अश्विनच्या ( R Ashwin) जाळ्यात ते सहज अडकले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 04:37 PM2021-02-14T16:37:47+5:302021-02-14T16:39:07+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 2nd Test: India ends Day 2 with 54/1 and the lead 249 runs | India vs England, 2nd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकले पाहुणे, टीम इंडियाकडे मजबूत आघाडी 

India vs England, 2nd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकले पाहुणे, टीम इंडियाकडे मजबूत आघाडी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआर अश्विननं घेतल्या ४३ धावांत ५ विकेट्स, इशांत शर्मा व अक्षर पटेल यांना प्रत्येकी दोन विकेट्सभारताच्या ३२९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १३४ धावांवर गडगडला

India vs England, 2nd Test Day 2 : चेन्नईच्या खेळपट्टीवरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची साथ मिळाली. त्यातही रोहित शर्मा ( Rohit Sharma), अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी दमदार खेळ करताना भारताला पहिल्या डावात ३२९ धावा करून दिल्या. पण, इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही आणि आर अश्विनच्या ( R Ashwin) जाळ्यात ते सहज अडकले. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९४ धावांची आघाडी घेतली.  दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ५४ धावा करताना २४९ धावांनी आघाडी वाढवली आहे. शुबमन गिलच्या रुपानं भारताला पहिला धक्का बसला आहे.  सर तुम्ही गरजेपेक्षा अधिक ‘social distance' पाळताय; पंतप्रधानांच्या 'त्या' फोटोवर आनंद महिंद्रा यांचं मजेशीर ट्विट

मॅचचे हायलाईट्स
- सकाळच्या सत्रात टीम इंडियाचे तळाचे चार फलंदाज २९ धावाच करू शकले. रिषभ पंत ( Rishabh Pant) ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिच यानं २ विकेट्स घेतल्या. 

- इंशात शर्मानं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. त्यानंतर पदार्पणवीर अक्षर पटेलनं ( Axar Patel) इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद करून मोठं यश मिळवून दिलं. आर अश्विन 'जगात भारी'; भारतीय गोलंदाजाच्या नावावर ऐतिहासिक विक्रम

- उरलेली कसर आर अश्विननं पूर्ण केली. त्यानं २३.५ षटकांत ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. इशांत शर्मा व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली.

- घरच्या मैदानावरील ४५ कसोटींमध्ये अश्विननं २३वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. त्यानं यासह जेम्स अँडरसनचा ( ८९ कसोटी व २२ वेळा पाच विकेट्स) विक्रम मोडला. या विक्रमात मुथय्या मुरलीधरन ( ४५), रंगना हेराथ ( २६) आणि अनिल कुंबळे ( २५) आघाडीवर आहेत.Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!

- स्टुअर्ट ब्रॉडला बाद करून अश्विननं इतिहास घडवला. कसोटी क्रिकेटमध्ये २०० डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.  या विक्रमात त्याच्यानंतर मुथय्या मुरलीधरन ( १९१), जेम्स अँडरसन ( १८६), ग्लेन मॅकग्राथ ( १७२) व शेन वॉर्न ( १७२) यांचा क्रमांक येतो. आर अश्विननं मोडला कपिल देव, हरभजन सिंग यांचा विक्रम

- शुबमन गिल ( १४) धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा ( २५) आणि चेतेश्वर पुजारा ( ७) खेळत आहेत.
 

Web Title: India vs England, 2nd Test: India ends Day 2 with 54/1 and the lead 249 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.