India Vs Bangladesh 2nd T20I : रोहित शर्माची फटकेबाजी; भारताची मालिकेत बरोबरी

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रोहित शर्मा आणि शिखर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:02 PM2019-11-07T18:02:52+5:302019-11-07T22:24:59+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Bangladesh, 2nd T20I Live Score Updates, Ind Vs Ban Highlights and Commentary in Marathi | India Vs Bangladesh 2nd T20I : रोहित शर्माची फटकेबाजी; भारताची मालिकेत बरोबरी

India Vs Bangladesh 2nd T20I : रोहित शर्माची फटकेबाजी; भारताची मालिकेत बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी जोरदार फटकेबाजी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या सामन्यात 'महा' चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण वादळ आणलं ते रोहितनं... त्याच्या दमदार फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांना पालापाचोळ्यासारखं भिरकावून दिलं. 

10:23 PM

10:22 PM

10:12 PM

10:05 PM

09:46 PM

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद 63 धावा केल्या. त्यातील 46 धावा या एकट्या रोहितनं केल्या होत्या. रोहितनं 23 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. रोहित-धवननं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 11वेळा अर्धशतकी भागीदारी केली. या कामगिरीसह त्यांनी मार्टिन गुप्तील व केन विलियम्सन ( न्यूझीलंड) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहितनं ( 380+) स्वतःच्या नावावर केला. तसेच रोहितनं विराट कोहलीच्या 22 अर्धशतकांशीही बरोबरी केली. 

09:42 PM

Image

09:38 PM

09:33 PM

09:29 PM

09:28 PM

08:58 PM

08:54 PM

07:56 PM

वॉशिंग्टन सूंदरनं भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानं मोहम्मद नईमला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. नईमने 31 चेंडूंत 5 चौकारांसह 36 धावा केल्या. 

07:52 PM

07:46 PM

07:12 PM

खलिल अहमदनं आजच्या सामन्यात स्वतःच्या पहिल्याच षटकात तीन चेंडूवर सलग चौकार दिले. त्यानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात सलग चार चौकार दिले होते आणि आजच्या सामन्यात सलग तीन चौकार देत त्यानं सलग सात चौकार देण्याचा नकोसा विक्रम नोंदवला. 

07:05 PM

07:02 PM

06:58 PM

Image

06:58 PM

Image

06:35 PM

06:32 PM

भारतीय संघात एकही बदल नाही.

06:29 PM

06:28 PM

06:04 PM

खूशखबर- दुसरा सामना होणार

Web Title: India Vs Bangladesh, 2nd T20I Live Score Updates, Ind Vs Ban Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.