Ind vs Ban, Day Night Test: रिषभ पंतला टीम इंडियानं रिलीज केलं; राखीव यष्टिरक्षक म्हणून केएस भारतला बोलावलं

India vs Bangladesh Day Night Test Match: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:38 PM2019-11-23T13:38:39+5:302019-11-23T13:38:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangadesh Day Night Test Match; Rishabh Pant released by Team India, KS Bharat named cover for Wriddhiman Saha | Ind vs Ban, Day Night Test: रिषभ पंतला टीम इंडियानं रिलीज केलं; राखीव यष्टिरक्षक म्हणून केएस भारतला बोलावलं

Ind vs Ban, Day Night Test: रिषभ पंतला टीम इंडियानं रिलीज केलं; राखीव यष्टिरक्षक म्हणून केएस भारतला बोलावलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या डे नाइट कसोटीच्या पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर 3 बाद 174 अशी मजल मारली आहे. पण, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण आले आहे. या सामन्यासाठी बाकावर बसवलेल्या रिषभ पंतला टीम इंडियानं अचानक रिलीज केलं. त्यामुळे वृद्धीमान साहाला राखीव खेळाडू म्हणून संघानं यष्टिरक्षक कोना श्रीकर भारत याला स्थान दिलं. 

टीम इंडियानं रिषभला सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेच्या सामन्यासाठी रिलीज केलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी रिषभला कोलकाता कसोटीतून रिलीज केलं आहे. त्याच्या जागी साहाला राखीव यष्टिरक्षक म्हणून भारतला बोलावण्यात आले आहे. या सामन्यात भारत संघासोबत असेल. पंत सध्या कामगिरीशी झगडत आहे आणि स्थानिक सामन्यात त्याला तो फॉर्म मिळवण्याची संधी आहे. 

''वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामन्यांत रिषभ खेळणार आहे. त्यासाठी त्याला तयारी करण्याचा वेळ मिळावा यासाठी निवड समितीनं त्याला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी दिली आहे,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. भारतनं 2015मध्ये दुलीप चषक स्पर्धेचा डे नाइट सामना खेळला आहे. 

विराट कोहलीनं करून दाखवलं; टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला जमला नाही हा पराक्रम
पहिल्या दिवशी विराटनं असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला जमला नाही. शिवाय विराटनं ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचाही विक्रम मोडला. विराटनं या सामन्यांत कर्णधार म्हणून कसोटीत 5000 धावांचा पल्ला पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. शिवाय त्यानं सर्वात जलद हा टप्पा पार करण्याचा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. 

सर्वात जलद 5000 धावा करणारे कर्णधार
86* डाव - विराट कोहली
97 डाव - रिकी पाँटिंग
106 डाव - क्लाईव्ह लॉईड
110 डाव - ग्रॅमी स्मिथ
116 डाव - अ‍ॅलन बॉर्डर 

सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार
विराट कोहली - 86* डाव - 5027 धावा
महेंद्रसिंग धोनी - 96 डाव - 3454 धावा
सुनील गावस्कर - 74 डाव - 3449 धावा
मोहम्मद अझरुद्दीन - 68 डाव - 2856 धावा
सौरव गांगुली - 75 डाव - 2561 धावा 

Web Title: India vs Bangadesh Day Night Test Match; Rishabh Pant released by Team India, KS Bharat named cover for Wriddhiman Saha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.