India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाची पाटी कोरीच राहणार; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा दावा  

भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरला आणि फलंदाजीही डिप नाही

By स्वदेश घाणेकर | Published: November 28, 2020 11:23 AM2020-11-28T11:23:32+5:302020-11-28T11:24:28+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: ‘Indian ODI team is too old school,’ Michael Vaughan feels India will lose to Australia in all formats | India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाची पाटी कोरीच राहणार; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा दावा  

India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाची पाटी कोरीच राहणार; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा दावा  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia : भारतीय संघ ९ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड टीमला पराभवाचा सामना करावा लागला. गचाळ क्षेत्ररक्षण, गोलंदाजीत सातत्य नसणे आणि आघाडीच्या फलंदाजांचे अपयश, हे टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरले. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. अॅरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑसींनी मोठा डोंगर उभा केला. 

फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली.  वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या. टीम इंडियाचा पराभव होत असताना डेव्हिड वॉर्नर तेलुगू गाण्यावर नाचत होता, Video Viral

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था ४ बाद १०१ धावा अशी झाली होती. पण,  हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावा जोडल्या. धवन ७४ धावांवर माघारी परतला. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार खेचून ९० धावांवर बाद झाला. वन डे क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. अॅडम झम्पानं ५४ धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनं ५३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या.  टीम इंडियाला ऑल राऊंडर हवा?; हार्दिक पांड्या म्हणतो... गोलंदाजी कधी करीन माहीत नाही!

पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला तीनही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागेल, असे ट्विट केलं. ''ऑस्ट्रेलियाचा संघ तीनही मालिकेत टीम इंडियाला पराभूत करेल, असे मला वाटतं.'' 


भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरला आणि फलंदाजीही डिप नाही. भारतीय संघ जुन्या मानसिकतेनं खेळतेय, असेही वॉन म्हणाला.  

 

Web Title: India vs Australia: ‘Indian ODI team is too old school,’ Michael Vaughan feels India will lose to Australia in all formats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.