India vs Australia : पांड्या आला रे...! संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी हार्दिकची विक्रमी खेळी, जगात पाचवा

फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 27, 2020 04:05 PM2020-11-27T16:05:55+5:302020-11-27T16:12:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : Hardik Pandya gone past 1000 ODI runs, Fewest balls taken to reach 1000 ODI runs | India vs Australia : पांड्या आला रे...! संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी हार्दिकची विक्रमी खेळी, जगात पाचवा

India vs Australia : पांड्या आला रे...! संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी हार्दिकची विक्रमी खेळी, जगात पाचवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे मयांक अग्रवाल व शिखर धवन यांनी दमदार सुरुवात, पण...४ बाद १०१ धावा अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी हार्दिक धावून आलाहार्दिक पांड्यानं ३१ चेंडूंत पूर्ण केलं अर्धशतक

India Vs Australia : अॅरोन फिंच ( Aaron Finch), स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith), डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या मर्यादा पहिल्या वन डे सामन्यात स्पष्ट केल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तगडं आव्हान उभं केलं. त्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटकाही टीम इंडियाला सोसावा लागला. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे आघाडीचे शिलेदार झटपट माघारी परतले. शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाची खिंड लढवली. हार्दिकनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानं केदार जाधवचा विक्रम मोडला. 

फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली.  वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. स्मिथ व फिंच यांनी ३१-४० षटकांत ९५ धावा चोपल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावा जोडल्या.

मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथनंही ६२ चेंडूंत शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून हे तिसरे जलद शतक ठरले. यापूर्वी २०१५मध्ये मॅक्सवेलनं श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत, तर जेम्स फॉल्कनरनं २०१३मध्ये भारताविरुद्ध ५७ चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला मयांक अग्रवाल व धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. जोश हेझलवूडनं ही जोडी तोडताना मयांकला ( २२) माघारी पाठवलं. त्यानंतर झेलडवूडनंच १०व्या षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. त्यानं कर्णधार विराट कोहली ( २१) आणि श्रेयस अय्यर (२) यांना बाद केले. आयपीएलमध्ये फॉर्मात दिसलेला लोकेश राहुल १२ धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. 

४ बाद १०१ धावा अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी हार्दिक धावून आला. त्यानं संयमी खेळी करणाऱ्या धवनला साजेशी साथ दिली. हार्दिकनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह त्यानं वन डे क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्लाही पार केला. धवनसह त्यानं पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकनं भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम नावावर केला. हार्दिकनं ८५७ चेंडूंत १००० धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम केदार जाधवच्या ( ९३७ चेंडू) नावावर होता.

Read in English

Web Title: India vs Australia : Hardik Pandya gone past 1000 ODI runs, Fewest balls taken to reach 1000 ODI runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.