India vs Australia, 4th Test : नव्या दमाच्या गोलंदाजांनी दाखवला इंगा; रोहित शर्माचा अफलातून झेल, Video

India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेणारा शार्दूल ठाकूर हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. याआधी कर्सन घावरी यांनी दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली होती. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं २ बाद ६५ धावा केल्या आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: January 15, 2021 07:34 AM2021-01-15T07:34:16+5:302021-01-15T07:35:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 4th Test : Rohit Sharma has taken a terrific catch, Aussies lose both opener, Video | India vs Australia, 4th Test : नव्या दमाच्या गोलंदाजांनी दाखवला इंगा; रोहित शर्माचा अफलातून झेल, Video

India vs Australia, 4th Test : नव्या दमाच्या गोलंदाजांनी दाखवला इंगा; रोहित शर्माचा अफलातून झेल, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देडेव्हिड वॉर्नर व मार्कस हॅरीस ही सलामीची जोडी माघारीमोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांना मिळाले यशस्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन लढवतायेत खिंड

India vs Australia, 4th Test : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढतच चालली आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका टीम इंडियाला बसलेला पाहायला मिळतोय. चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या अंतिम १२मध्ये केवळ एक बदल आहे, तर टीम इंडियाच्या अंतिम ११मध्ये चार बदल झाले आहेत. विल पुकोव्हस्की दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही आणि त्याच्या जागी मार्कस हॅरीसचा समावेश केला गेला आहे. आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी यांना दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहे. त्यांच्याजागी टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांना पदार्पणाची संधी मिळाली, तर मयांक अग्रवाल व शार्दूल ठाकूर यांचे पुनरागमन झाले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

एकाच दौऱ्यावर वन डे , ट्वेंटी-20 आणि कसोटी संघात पदार्पण करणारा टी नटराजन हा पहिलाच भारतीय ( जगभरात १७वा) ठरला आहे. एकाच सत्रात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा भुवनेश्वर कुमार ( २०१२-१३) याच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला. वॉशिंग्टन सुंदरही टीम इंडियांकडून तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा तिसरा खेळाडू ठरला. इशांत शर्मानं १९ वर्ष व १५२ दिवसांचे असताना टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रिषभ पंत ( २१ वर्ष व १७ दिवस) आणि वॉशिंग्टन सुंदर ( २१ वर्ष व १०२ दिवस) यांचा क्रमांक येतो. 

ऑस्ट्रेलियन संघाच्या तुलनेत भारतीय गोलंदाजाची फळी अनुभवात फार कमी आहे. ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड हे अनुभवी गोलंदाज आहेत. या सर्वांनी एकूण ५०४ सामन्यांत १०४६ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी नटराजन या गोलंदाजांच्या नावावर १३ विकेट्स आहेत. २०१५नंतर टीम इंडियानं मैदानावर उतरवलेल्या अंतिम ११मध्ये आताची गोलंदाजीची फळी ही सर्वात कमी अनुभव असलेली आहे. या कसोटीसाठीच्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज ( ७), नवदीप सैनी ( ४) आणि रोहित शर्मा ( २) यांच्या नावावर एकूण १३ विकेट्स आहेत.  

पण, तरीही सिराजनं पहिल्या दिवसाच्या पहिल्याच षटकात डेव्हीड वॉर्नरला ( David Warner) माघारी पाठवले. सहाव्या चेंडूवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्मानं ( Rohit Sharma) अफलातून झेल घेत वॉर्नरला ४ धावांवर तंबूत जाण्यास भाग पाडले. त्यानंतर ९व्या षटकार अजिंक्य रहाणेनं चेंडू शार्दूल ठाकूरकडे सोपवला अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर मार्कस हॅरिसला ( ५) बाद केले. १९८५नंतर ( वि. न्यूझीलंड) गॅबा कसोटीत प्रथमच ऑस्ट्रेलियानं पहिल्या षटकात विकेट गमावली. 

ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेणारा शार्दूल ठाकूर हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. याआधी कर्सन घावरी यांनी दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली होती. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं २ बाद ६५ धावा केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: India vs Australia, 4th Test : Rohit Sharma has taken a terrific catch, Aussies lose both opener, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.