India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरवण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया 'त्या' खेळाडूची मेंटल फिटनेस तपासणार

India vs Australia, 3rd Test : तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियानं सलामीवीर जो बर्न्सला बाहेरचा रस्ता दाखवला. बर्न्सला चार डावांत अनुक्रमे ८, ५१, ० आणि ४ धावा करता आल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: January 1, 2021 08:49 AM2021-01-01T08:49:53+5:302021-01-01T08:50:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : Will Pucovski To Make Call On Mental Well-being Before SCG Test | India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरवण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया 'त्या' खेळाडूची मेंटल फिटनेस तपासणार

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरवण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया 'त्या' खेळाडूची मेंटल फिटनेस तपासणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 3rd Test : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका निर्णायक वळणावर आली आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं जोरदार पुनरागमन करून ऑस्ट्रेलियाला धक्का दिला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma) टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी नक्कीच भरली असेल. पण, त्यांच्याही डेव्हिड वॉर्नर ( David Warner) सज्ज आहे. तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांच्या Playing XIमध्ये बदल नक्की पाहायला मिळेल. मात्र, टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची मानसिक तंदुरुस्ती ( mental fitness ) तपासली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियानं सलामीवीर जो बर्न्सला बाहेरचा रस्ता दाखवला. बर्न्सला चार डावांत अनुक्रमे ८, ५१, ० आणि ४ धावा करता आल्या. त्याच्या जागी संघात वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) यांचे पुनरागमन झाले. जलदगती गोलंदाज सिन अॅबोट ( Sean Abbott) याचेही संघात पुनरागमन झाले आहे. तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी विल पुकोव्हस्कीनं त्याच्या मानसिक तंदुरुस्तीबाबात निर्णय कळवावा, असे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीनं सांगितले आहे. या आठवड्याच्या शेवटी त्याच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय होईल.

स्थानिक क्रिकेटच्या कारकिर्दीत २२ वर्षीय पुकोव्हस्कीच्या डोक्यावर ९ वेळा चेंडू आदळला. भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि त्याला माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाचे फलंदाजी प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड यांच्या मते पुकोव्हस्की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी तयार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी त्यानं सलग दोन द्विशतक झळकावली आणि प्रमथ श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या धावांची सरासरी ५४ इतकी आहे. त्याला याआधीही ऑस्ट्रेलियाच्या संघात संधी मिळाली होती, परंतु त्यानं मानसिक स्वास्थ्याच्या कारणामुळे माघार घेतली.  

दी सिडनी मॉर्निंग हेराल्डला मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की,'' तो मानसिकदृष्ट्या सज्ज आहे का, याबाबतचा निर्णय त्याच्यावरच सोपवला गेला पाहिजे. तसा विश्वास त्याच्यावर दाखवला गेला पाहिजे. त्यानंतर प्रशिक्षकांनी निर्णय घ्यावा.'' 


ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ - टीम पेन, सीन अॅबोट, पॅट कमिन्स, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हीस हेड, मोईसेस हेन्रीक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड , डेव्हिड वॉर्नर 
 

Web Title: India vs Australia, 3rd Test : Will Pucovski To Make Call On Mental Well-being Before SCG Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.