India vs Australia, 3rd Test : 'धर्मावरून, रंगावरून ऑस्ट्रेलियात अनेकदा बरंच काही ऐकलं आहे'; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले

 India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 10, 2021 11:44 AM2021-01-10T11:44:44+5:302021-01-10T11:45:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : 'Unacceptable, unfortunate': Former India and Australia cricketers explode on Twitter after racial attacks on Team India | India vs Australia, 3rd Test : 'धर्मावरून, रंगावरून ऑस्ट्रेलियात अनेकदा बरंच काही ऐकलं आहे'; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले

India vs Australia, 3rd Test : 'धर्मावरून, रंगावरून ऑस्ट्रेलियात अनेकदा बरंच काही ऐकलं आहे'; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही ( Ajinkya Rahane) आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं त्याचा अनुभव सांगताला ऑस्ट्रेलियात अनेकदा धर्म व रंगांवरून टीका केली गेल्याचे सांगितले. दरम्यान, आजच्या घटनेचा अनेक क्रिकेटपटूनी निषेध केला.

भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. मार्नस लाबुशेन ( ७३), स्टीव्हन स्मिथ ( ८१) आणि कॅमेरून ग्रीन ( ८४) यांनी दमदार खेळ केला. पण, टी टाईम होण्यापूर्वी सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि जवळपास १५-२० मिनिटे सामना थांबवण्यात आला.  पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सिराजनं सांगितलेल्या स्टँडमधून सहा प्रेक्षकांना बाहेर पाठवण्यात आले. 

''सिडनी कसोटीत काही चाहत्यांकडून असभ्य वर्तन करण्यात आल्याचे पाहुन वाईट वाटले. त्यांच्यामुळे खेळाला गालबोट लागले,''असे वीरेंद्र सेहवागनं ट्विट केलं. 


''सिडनीत जे घडलं, ते दुर्दैवी होतं. अशा वागणुकीता थारा द्यायला नको. खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका का केली जाते, हेच समजत नाही. तुम्हाला खेळाडूंचा आदर करायचा नसेल, तर नका येऊ आणि येथील वातावरण नका बिघडवू,''असे ट्विट व्ही व्ही एस लक्ष्मणने केलं. 


''ऑस्ट्रेलियात खेळताना मी अनेकदा माझ्या धर्म आणि रंगावरून बरंच काही ऐकलं आहे. चाहत्यांकडून प्रथमच असं घडत नाही, त्यांना कसं रोखावं?,''असा सवाल हरभजन सिंगनं केला. 
 
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही टीम इंडियाची माफी मागितली. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की,'अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचा तपास करत आहे आणि दोषी प्रेक्षकाची ओखळ पटल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यावर आजीवन बंदी घातली जाईल. CCTV फुटेजची पाहणी केली जात आहे.''

Web Title: India vs Australia, 3rd Test : 'Unacceptable, unfortunate': Former India and Australia cricketers explode on Twitter after racial attacks on Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.