India vs Australia 1st ODI : Rohit Sharma equals sachin Tendulkar's record | India vs Australia 1st ODI : रोहित शर्माची तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, कॅप्टन कोहली पडला मागे
India vs Australia 1st ODI : रोहित शर्माची तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, कॅप्टन कोहली पडला मागे

ठळक मुद्देरोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी भारताचा डाव सावरलादोघांनी चौथ्या विकेटसाठी संयमी खेळी करताना शतकी भागीदारीरोहित शर्माचे वन डेतील 38 वे अर्धशतक

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी संयमी खेळी करताना  शतकी भागीदारी केली. हिटमॅन रोहितने या भागीदारीत एक विक्रम नावावर करताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी'व्हिलियर्सला सर्वाधिक षटकारांचा विक्रम मागे टाकला. त्यानंतर त्याने अर्धशतकी खेळी साकारताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर दुसऱ्या विक्रमात कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला.शिखर धवन, अंबाती रायुडू आणि कोहली हे अवघ्या 4 धावांवर माघारी परतले. त्यानंतर रोहित व धोनीने सामन्याची सूत्र हाती घेत सुरुवातीला संयमी आणि खेळपट्टीवर टिकल्यानंतर आक्रमक खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. रोहितने वन डेतील 38 वे अर्धशतक पूर्ण करून विक्रमाला गवसणी घातली.  रोहितने वन डेत सलग तिसऱ्यांदा 50हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सहाव्यांदा 50हून अधिक धावा केल्या आहेत. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी आला आहे. तेंडुलकर या क्रमवारीत (11) आघाडीवर आहे. रोहितने एकूण 9 वेळा ऑस्ट्रेलियात 50हून अधिक धावा केल्या आहेत आणि त्याने कोहलीला (8) मागे टाकले. 
 

 


Web Title: India vs Australia 1st ODI : Rohit Sharma equals sachin Tendulkar's record
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.