India vs Australia 1st ODI: MS Dhoni reach milestone, complete 10,000 ODI runs for India | India vs Australia 1st ODI : धोनीची एक धाव ठरली विक्रमी, हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय
India vs Australia 1st ODI : धोनीची एक धाव ठरली विक्रमी, हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं अखेर शनिवारी त्या विक्रमाला गवसणी घातली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला हा विक्रम करण्याची संधी होती, परंतु त्याला तशी संधी मिळाली नाही, मात्र, शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात त्याने एक धाव घेत आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी 10000 धावांचा पल्ला पार केला.धोनीच्या नावावर 10, 173 धावा आहेत, परंतु त्यापैकी केवळ 9999 धावा या भारताकडूनच्या आहेत. उर्वरित धावा त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना केल्या आहेत.  त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना 2007 मध्या आफ्रिका एकादश संघाविरुद्ध 174 धावा केल्या. 

भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे भारताकडून 10 धावा करणारा धोनी पाचवा खेळाडू ठरला आहे. धोनीने 332 सामन्यात 50.11 च्या सरासरीने 10000 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)
11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)
10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)
10232 धावा – विराट कोहली (216 सामने)
 


Web Title: India vs Australia 1st ODI: MS Dhoni reach milestone, complete 10,000 ODI runs for India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.