India vs Australia 1st ODI : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव | India vs Australia 1st ODI : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव
India vs Australia 1st ODI : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रोहित शर्माच्या झुंजार शतकी खेळीनंतरही इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने पहिल्या वनडेत भारतीय संघाला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. आघाडीची फळी कोलमडल्यानंतर रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. मात्र 129 चेंडूत 133 धावा फटकावणाऱ्या रोहितला धोनी वगळता इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. अखेरीस भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावाच करता आल्या. 

तत्पूर्वी  उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँड्सकोम्ब यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले होते. मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 288 धावा केल्या.

LIVE

Get Latest Updates

03:54 PM

भारताचा 34 धावांनी पराभव 

03:04 PM

रोहितचे वन डेतील 22 वं शतक 

03:04 PM

भारताला 10 षटकांत हव्यात 109 धावा 

03:00 PM

भारताला विजयासाठी हव्यात 113 धावा 

02:44 PM

'हिटमॅन' रोहित शर्मानं मोडला ABDचा विक्रम 

02:27 PM

भारताला चौथा धक्का 

02:22 PM

महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक 

01:57 PM

रोहित शर्माचे अर्धशतक, भारताच्या शंभर धावा 

01:49 PM

रोहित शर्माचे अर्धशतक, भारताच्या 3 बाद 95 धावा 

01:42 PM

महेंद्रसिंग धोनीचा झेल सोडला 

12:24 PM

अंबाती रायुडूही भोपळ्यावर बाद 

12:21 PM

भारताच्या 2 बाद 4 धावा 

12:11 PM

भारताला पहिल्याच षटकात धक्का 

11:36 AM

उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँड्सकोम्ब यांचे अर्धशतक 

11:32 AM

ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 288 धावा 

11:16 AM

गब्बरने घेतला झेल, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का 

10:57 AM

पीटर हॅँड्सकोम्बचे अर्धशतक, ऑस्ट्रेलिया 4 बाद 222 

10:29 AM

शॉन मार्श आऊट, ऑसी 4 बाद 186 

10:23 AM

शॉन मार्शचे अर्धशतक 

10:01 AM

रवींद्र जडेजाने मिळवून दिली महत्त्वाची विकेट 

09:46 AM

उस्मान ख्वाजा 59 धावांवर माघारी 

09:34 AM

उस्मान ख्वाजाचे अर्धशतक 

09:32 AM

ऑस्ट्रेलियाच्या 25 षटकांत 2 बाद 116 धावा 

09:07 AM

भुवनेश्वर कुमारचा पराक्रम 

09:04 AM

ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 75 धावा 

08:41 AM

अॅलेक्स करीची विकेट 

08:34 AM

ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज माघारी

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा अप्रतिम झेल 

08:17 AM 

08:04 AM

ऑस्ट्रेलियाला पहिला झटका

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिंच याला भुवनेश्वरने केले बाद.


07:26 AM

ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

07:20 AM

ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू

अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कोम्ब, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लियोन, पीटर सिडल,ृ झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरेनडोर्फ. 

07:15 AM

भारतीय संघातील खेळाडू

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंदसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. 


Web Title: India vs Australia 1st ODI : रोहित शर्माचे शतक व्यर्थ, भारताचा 34 धावांनी पराभव
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.