India Tour of Australia : भारताविरुद्ध खेळावं की नाही?, ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचं काहीच ठरत नाही

या दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही. दुखापतीमुळे रोहितचा मर्यादित षटकांच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: November 16, 2020 04:48 PM2020-11-16T16:48:03+5:302020-11-16T16:48:28+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of Australia : Pat Cummins Yet To Decide On Availability for White-ball Series | India Tour of Australia : भारताविरुद्ध खेळावं की नाही?, ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचं काहीच ठरत नाही

India Tour of Australia : भारताविरुद्ध खेळावं की नाही?, ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचं काहीच ठरत नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यावर होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सरावालाही लागले आहेत. BCCIनं खेळाडूंच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही. दुखापतीमुळे रोहितचा मर्यादित षटकांच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी असताना ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातही अशाच बातमीचे संकेत मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू भारताविरुद्ध खेळावं की नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहे.

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) चे या मालिकेत खेळावं की नाही, हे अजून ठरत नाही. २७ नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. कमिन्स आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाचा सदस्य होता. ऑगस्टमध्ये इंग्लंड दौरा आणि त्यानंतर आयपीएलसाठी UAEमध्ये दाखल झाल्यापासून कमिन्स बायो बबलमध्येच होता. त्यामुळे त्याला थकवा जाणवण्याची भीती वाटत आहे.

''मी अद्याप अंतिम निर्णयावर पोहोचलेलो नाही. माझ्यासारखी अनेक लोकं आहेत ज्यांना या अभूतपूर्व काळात आयुष्यातील बराच कालावधी हा बायो बबलमध्ये घालवावा लागत आहे. त्यामुळे चर्चेची सर्व दारं उघडी आहेत. जेव्हा जवळच्या माणसांची भेट होईल, तेव्हा त्यांच्याशी याबाबत चर्चा नक्की करेन,''असे कमिन्सने सांगितले. कमिन्सचा तीनही संघात समावेश केला गेला आहे. तो संघाचा उपकर्णधार आहे.   

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ 
डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन. 
 

ऑस्ट्रेलियाचा वन डे व ट्वेंटी-20 संघ 
आरोन फिंच ( कर्णधार), सीन अबॉट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, मोईसेस हेन्रीक्स. मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनिएल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा. 

वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) 
२७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून  
२९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून 
२ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून

ट्वेंटी-20 मालिका
४ डिसेंबर -  मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून
६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून
८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून         
 
६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 

कसोटी मालिका 
१७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ -  सकाळी ९.३० वाजल्यापासून  
२६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून

Web Title: India Tour of Australia : Pat Cummins Yet To Decide On Availability for White-ball Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.