Sunil Gavaskar Vs Virat Kohli : लढण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंनी शस्त्र म्यान केले; विराट कोहलीच्या रणनीतीवर सुनील गावस्कर भडकले!

India vs South Africa Test Series : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी  केपटाऊन कसोटीच्या पराभवानंतर भारतीय संघाला खडेबोल सुनावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 05:52 PM2022-01-15T17:52:38+5:302022-01-15T17:53:47+5:30

whatsapp join usJoin us
'India Decided They're Not Going to Win': Sunil Gavaskar Slams Strategy of Kohli & Co in Cape Town Test | Sunil Gavaskar Vs Virat Kohli : लढण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंनी शस्त्र म्यान केले; विराट कोहलीच्या रणनीतीवर सुनील गावस्कर भडकले!

Sunil Gavaskar Vs Virat Kohli : लढण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंनी शस्त्र म्यान केले; विराट कोहलीच्या रणनीतीवर सुनील गावस्कर भडकले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa Test Series : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी  केपटाऊन कसोटीच्या पराभवानंतर भारतीय संघाला खडेबोल सुनावले. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवलंबवलेल्या रणनीतीवर गावस्करांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लंच ब्रेक झाला तेव्हा यजमानांना विजयासाठी ४१ धावा करायच्या होत्या आणि भारताला ७ विकेट्स घ्यायच्या होत्या. ब्रेकनंतर आफ्रिकेनं सहजतेनं धावा केल्या आणि भारतीय संघाला इतिहास रचण्यापासून रोखले.

ही कसोटी संपण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंनी शस्त्र म्यान केले होते, असे गावस्कर यांना वाटते. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कसोबत बोलताना त्यांनी लंच ब्रेकनंतर शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांनी गोलंदाजी का केली नाही?, असा सवाल केला. भारतानं आपण हरलोय, हे जवळपास मान्य केले होते आणि त्यामुळेच त्यांनी विजयासाठी प्रयत्न केले नाही, असे गावस्कर म्हणाले. 

गावस्कर म्हणाले,''आर अश्विन गोलंदाजी करताना ठेवलेली फिल्ड प्लेसमेंट योग्य नव्हती. एकेरी धाव सहज मिळत होते. पाच खेळाडू डिपमध्ये उभे केले होते. फलंदाज या संधीवर फटके मारत होते आणि अशात त्यांना बाद करण्याची संधी होती. आफ्रिकेच्या संघाचं कौतुक करायला हवं, या खेळपट्टीवर फलंदाजी करणं तितकं सोपं नव्हतं, तरीही त्यांनी दृढ निश्चय दाखवला. त्यांनी लढाऊ बाणा दाखवला.''

या मालिकेत २८ वर्षीय फलंदाज किगन पीटरसननं उल्लेखनीय कामगिरी केली. कारकीर्दितील दुसऱ्याच मालिकेत त्यानं प्लेअर ऑफ दी मॅच आणि प्लेअर ऑफ दी सीरिजचा पुरस्कार जिंकला. त्यानं ६ डावांत सर्वाधिक २७६ धावा केल्या आणि त्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता.  

Web Title: 'India Decided They're Not Going to Win': Sunil Gavaskar Slams Strategy of Kohli & Co in Cape Town Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.