India is crazy!; असं का म्हणतोय डेल स्टेन?; निवृत्तीनंतर भारतीयांबद्दल मांडलं स्पष्ट मत

दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन यानं मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:13 PM2021-09-01T13:13:42+5:302021-09-01T13:14:30+5:30

whatsapp join usJoin us
‘India is crazy, You’re treated like a Hollywood or Bollywood star’, Dale Steyn recalls playing experience in India | India is crazy!; असं का म्हणतोय डेल स्टेन?; निवृत्तीनंतर भारतीयांबद्दल मांडलं स्पष्ट मत

India is crazy!; असं का म्हणतोय डेल स्टेन?; निवृत्तीनंतर भारतीयांबद्दल मांडलं स्पष्ट मत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन यानं मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सचिन तेंडुलकर सर्वांनी डेल स्टेनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या जलदगती गोलंदाजानं जगभरातील दिग्गज फलंदाजांना शरणागती पत्करण्यात भाग पाडले. वेग, स्विंग, सिम, यॉर्कर यांचा अचूक वापर करणारा डेल जगासाठी स्टेन गन झाला. स्टेन गननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ विकेट्स घेऊन वर्चस्व गाजवले. दुखापतीमुळे मागील काही वर्ष त्याला सतावले, परंतु त्यानंही तो खचला नाही. 

IND vs ENG : रवींद्र जडेजाच्या दुखापतीबाबत आले अपडेट्स, जाणून घ्या चौथ्या कसोटीत खेळणार की नाही!

डेल स्टेननं दक्षिण आफ्रिकेकडून ९३ कसोटी सामन्यांत ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. १२५ वन डे व ४७ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर १९६ व ६४ विकेट्स आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यानं ६१८ विकेट्स घेतल्या आहेत. स्टेननं २०१९मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला होता.

''सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग हे अविश्वसनीय फलंदाज होते. गोलंदाजाच्या प्रत्येक रणनीतीचा सामना करण्याचा व त्यावर तोडगा शोधून काढण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यामुळेच फलंदाज व गोलंदाज असा चुरशीचा सामना रंगायचा. पण, त्यांच्याकडे फक्त एकच संधी असायची अन् माझ्याकडे किमान सहा चेंडू,''असे स्टेन दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या वेबसाईटशी बोलताना म्हणाला.   

CPL 2021 : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा विक्रम, पण चर्चा होतेय ती त्याच्या विचित्र निषेधाची, पाहा Video


आयपीएलमध्ये त्यानं ९५ सामन्यांत ९७ विकेट्स घेतल्या आहेत. स्टेननं यावेळी भारतातील अनुभवाबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या. २०१९मध्ये तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघाकडून आयपीएलमध्ये खेळला होता. तेव्हा त्याला भारतीय चाहत्यांकडून कशी वागणुक मिळाली हेही त्यानं सांगितले. ''India is crazy! भारतात फिरताना मला रॉकस्टारसारखे वाटत होते. हॉलिवूड किंवा बॉलिवूड स्टार प्रमाणे तुम्हाला प्रेम मिळते. विमानतळ, सराव करताना जिथे जावं तिथे लोकं गर्दी करायचे. जगात असा वेडेपणा, प्रेम मला कुठे दुसरीकडे मिळालं नसेल,''असे स्टेन म्हणाला. 

Web Title: ‘India is crazy, You’re treated like a Hollywood or Bollywood star’, Dale Steyn recalls playing experience in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.