Suryakumar Yadav On Shubman Gill Replace Sanju Samson As Opener : कसोटी आणि वनडेनंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-० मालिका खेळवण्यात येणार आहे. १९ डिसेंबरला कटकच्या मैदानातून या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. यावेळी त्याला संजू सॅमसनऐवजीशुभमन गिलला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती का देण्यात येत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सूर्यकुमार यादवनं जे उत्तर दिले ते न पडण्याजोगेच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजूच्या जागी शुभमन गिलला पहिली पसंती का? सूर्या म्हणाला...
भारतीय टी-२० संघातील सलामी जोडीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, संजू सॅमसन याने सलामीवीराच्या रुपात चांगली कामगिरी केली आहे. पण शुभमन गिल सलामीवीराच्या रुपात अधिक पात्र आहे. त्यामुळेच आम्ही त्याला पहिली पसंती देत आहोत. संजू सॅमसन याला सलामीवीराच्या रुपात संघात स्थान नसले तरी तो संघाच्या प्लॅनिंगचा महत्त्वपूर्ण भाग असून त्याला पुरेपूर संधी मिळेल, याची काळजी आम्ही घेणार आहोत.
तिन्ही प्रकारात शतक झळकवणाऱ्या ५ युवा फलंदाजांच्या यादीत ३ भारतीय; पण वर्ल्ड रेकॉर्ड झिम्बाब्वेचा
सलामीवीरांशिवाय सर्वांनाच लवचिक रहावे लागेल
सलामीवीरांशिवाय इतर सर्वांनाच लवचिक राहणं गरजेचे आहे. परिस्थितीनुसार, कोणत्याही फलंदाजाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला जाऊ शकतो. त्यानुसार त्यांना जुळवून घ्यावे लागेल. संजू आणि शुभमन गिल दोघेही कोणतीही जबाबदारी पार पाडू शकतात. त्यामुळे ती संघाची चांगली गोष्ट आहे.
कॅप्टन सूर्यानं दिलेले स्पष्टीकरण न पटण्याजोगे कारण...
सूर्यकुमार यादवच्या म्हणण्यानुसार, संजूच्या तुलनेत शुभमन गिल सलामीवीराच्या रुपात सर्वोत्तम पर्याय आहे. पण आकडेवारीच्या बाबतीत संजू हा शुभमन गिलपेक्षा भारी ठरतो. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय टी-२० संघाच्या डावाची सुरुवात करताना संजू सॅमसन याने धमकही दाखवली आहे. पण शुभमन गिल संघात परतताच संजू सॅमसनला वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची वेळ आली. ही गोष्ट संजूसह टीम इंडियासाठी निश्चितच चांगली नाही.