IND Vs NZ: सुपर ओव्हर सुरु असताना नेमकं मनात सुरु तरी काय होतं, रोहित शर्माने सांगितलं रहस्य...

रोहित पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 07:47 PM2020-01-29T19:47:47+5:302020-01-29T19:49:19+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs NZ: What exactly happens in the mind when Super Over starts, Rohit Sharma tells secret ... | IND Vs NZ: सुपर ओव्हर सुरु असताना नेमकं मनात सुरु तरी काय होतं, रोहित शर्माने सांगितलं रहस्य...

IND Vs NZ: सुपर ओव्हर सुरु असताना नेमकं मनात सुरु तरी काय होतं, रोहित शर्माने सांगितलं रहस्य...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो रोहित शर्मा. कारण अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत रोहितने संघाला विजय मिळवून दिला. पण सुपर ओव्हर सुरु असताना रोहितच्या मनात नेमकं होतं तरी काय...

Image result for rohit sharma in super over

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. फॉर्मात परतलेल्या रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासारखी होती. त्याला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्याकडून चांगली साथ मिळाली. त्या जोरावर टीम इंडियानं 5 बाद 179 धावा उभ्या केल्या. 

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवींच्या मार्टीन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी सावध सुरुवात केली, परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना माघारी पाठवून सामन्यात चुरस निर्माण केली. पण, कर्णधार केन विलियम्सननं चिवट खेळ करताना सामना किवींच्या बाजूनं झुकवला. पण, मोहम्मद शमीनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात रोहितनं अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतानं पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत केले. टीम इंडियानं मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Image result for rohit sharma in super over

रोहित पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये नेमकं कसे खेळावे हे रोहितला समजत नव्हते. सुपर ओव्हर सुरु असताना नेमके मनात काय होते, याबाबत रोहित म्हणाला की, " सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करावी की थोडं थांबून मोठे फटके मारायला हवेत, या द्विधा मनस्थितीमध्ये मी होतो."

न्यूझीलंडमध्ये भारताने रचला इतिहास; प्रथमच केला 'हा' पराक्रम...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने न्यूझीलंडमध्ये इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच भारताला हा पराक्रम करता आला आहे.

न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ यापूर्वी दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळला होता. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ पहिल्यांदा २००८ साली पहिली ट्वेन्टी-२० मालिका खेळला होता. या मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ २०१८ साली दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाने एक सामना जिंकला, पण त्यांना मालिका १-२ अशी गमवावी लागली होती.

Image result for rohit sharma in super over

यंदा न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ तिसरी ट्वेन्टी-२० मालिका खेळत आहे. न्यूझीलंडमधली ही पहिली भारताची पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या तिन्ही लढती भारताने जिंकल्या आहेत. त्याचबरोबर भारताने या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. हा भारताचा न्यूझीलंडमधील पहिला ट्वेन्टी-२० मालिका विजय आहे.

Web Title: IND Vs NZ: What exactly happens in the mind when Super Over starts, Rohit Sharma tells secret ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.